Cylinder Blast Saam tv
महाराष्ट्र

Cylinder Blast : रिक्षामध्ये ऑक्सीजन सिलेंडर ठेवताना स्फोट; एकाचा मृत्यू, दोनजण जखमी

Buldhana News : रुग्णालयात लागणारे ऑक्सिजन सिलेंडर भरण्याचे काम सुरु होते. तीन ते चार कामगार काम करत होते. रिक्षामध्ये हे ऑक्सीजन सिलेंडर ठेवण्याचे काम सुरु असताना यातून गॅस गळती होण्यास सुरवात झाली

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात दुर्दैवी घटना घडली आहे. रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर ठेवताना हि घटना घडली असून यात सिलेंडरचा स्फोट होऊन एका जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील लक्ष्मीनगर परिसरात सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. रुग्णालयात लागणारे ऑक्सिजन सिलेंडर भरण्याचे काम सुरु होते. तीन ते चार कामगार हे काम करत होते. रिक्षामध्ये हे ऑक्सीजन सिलेंडर ठेवण्याचे काम सुरु असताना यातून गॅस गळती होण्यास सुरवात झाली. काही क्षणातच या सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे मोठा आवाज होऊन परिसर हादरला होता. 

एका जणांचा मृत्यू 

ऑक्सिजन सिलेंडरमधून गळती होऊन सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे सिलेंडरचे तुकडे झाले होते. या स्फोटात एक जण ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमी कामगारांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच रिक्षाचे देखील यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नागरिकांची धावपळ 

रिक्षामध्ये सिलेंडर ठेवत असताना गॅस गळतीमुळे किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे हा स्फोट झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान परिसरात देखील यामुळे मोठा हादरा बसला होता. यामुळे नागरिकांमध्ये घाबरत पसरली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT