Malkapur News Saam tv
महाराष्ट्र

Malkapur News : वस्तीत असलेले बिअर बार हटवण्यासाठी महिलांचे दुकानासमोर बेमुदत उपोषण

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील आदर्षनगर परिसरात बिअर बारचे दुकान सुरु आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथे मद्यपीची गर्दी असते.

संजय जाधव

बुलढाणा : मलकापूर येथील आदर्श नगर् परिसरातील भर वस्तीत बिअर बार सुरु आहे. येथे येणाऱ्या मद्यपीची महिला, युवतींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वस्तीत असलेले बिअर बारचे दुकान हटविण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे. मात्र यावर कोणत्याही प्रकारे कारवाई होत नसल्याने परिसरातील महिलांनी एकत्रित येत बिअर बार समोरच बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर (Malkapur) येथील आदर्षनगर परिसरात बिअर बारचे दुकान सुरु आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथे मद्यपीची गर्दी असते. शिवाय अनेक चिडीमारीच्या घटना या बियर बारमुळे घडत आहेत. याचा परिसरातील रहिवाशींना त्रास सहन करावा लागत असून हे बियर बार परिसरातून हटवण्यासाठी दारूबंदी अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने परिसरातील शेकडो महिलांनी आंदोलनाची भूमिका घेत सरळ त्या बियर बार समोरच आमरण उपोषण सुरु केले आहे.

तर रस्त्यावर उतरून आंदोलन 

भर वस्तीत असलेले हे बियर बार तात्काळ हटवा. बहिणीच्या या मागणीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी लक्ष घालावे; अशी मागणी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांनी केली आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास मलकापूर शहरातील हजारो महिला रस्त्यावर उतरतील व उग्र आंदोलन करतील असा इशारा प्रेमलता सोनोने यांनी दिला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

Amaal Mallik Break: 'तूर्तास आपली रजा घेतो...'; प्रसिद्ध संगीतकाराचा चित्रपटसृष्टीला रामराम, कारण सांगत म्हणाला...

SCROLL FOR NEXT