Gramsevak Apeksha Pravin Kankal  SaamTV News
महाराष्ट्र

बुलढाण्यात ३५ वर्षीय ग्रामसेवक महिलेची आत्महत्या!

ग्रामसेवक असणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा शहरात घडली.

संजय जाधव

बुलढाणा : ग्रामसेवक (Gramsevak) असणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही धक्कादायक घटना बुलढाणा (Buldhana) शहरातील सुंदरखेड भागातील तार कॉलनीत घडली आहे. अपेक्षा प्रवीण कंकाळ (रा. तार कॉलनी, सुंदरखेड,बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. (Buldhana Gramsevak Suicide)

हे देखील पहा :

अपेक्षा यांचे पती प्रवीण कंकाळ हे लघुसिंचन विभागात नोकरीला आहेत. आज सकाळी त्यांचे पती प्रवीण हे कामावर निघून गेले. घटनेवेळी मोठा मुलगा घरातच होता. दरम्यान, "माझे डोके दुखत आहे" असे सांगून अपेक्षा या घरातील मागील खोलीत निघून गेल्या. काही वेळाने मुलगा त्या खोलीत गेला असता त्याला आपल्या आईने गळफास घेतला असल्याचे दिसून आले.

भांबावलेल्या मुलाने वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. प्रवीण कंकाळ तातडीने घरी आले आणि अपेक्षा यांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा हेलगे यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, अपेक्षा यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपेक्षा यांच्या पश्चात २ मुले व त्यांचे पती प्रवीण हे आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT