Shegaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Shegaon Crime : तरुणाला गाडीत डांबून बेदम मारहाण; शेगाव पोलिसांनी भाईगिरी उतरविली, परिसरातून काढली धिंड

Buldhana Shegaon News : शेगावमध्ये भररस्त्यात गाडीत बसवून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेत परिसरातून धिंड काढली

संजय जाधव

बुलढाणा : चारचाकी वाहनामध्ये एका तरुणाला डांबून अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव मध्ये समोर आला होता. अर्थात अशा पद्धतीने करून भाईगिरी करीत दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित असलेल्या दादा लोकांची शेगाव शहर पोलिसांनी भाईगिरी उतरविली आहे. पोलिसांनी ताब्यात घेत रात्री शेगावात धिंड काढली. 

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ताडी परिसरात काही युवक भाईगिरी करून दहशत पसरवीत होते. त्यांच्याकडून गुन्हे देखील घडलेले आहेत. हा प्रकार थांबून भाईगिरी संपुष्टात आली पाहिजे. तसेच दहशत पसरविणाऱ्या युवकांवर अंकुश लागला पाहिजे. यासाठी शहर पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन पाटील यांनी नुकत्याच गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींची शहरातून धिंड काढली आहे. आरोपीने एका तरुणाला बेदम मारहाण करत परिसरात दहशत पसरवली होती. 

पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल 

यासंदर्भात पिडीत युवकाच्या पत्नीने शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्या पतीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवुन लाकडी काठी व पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना जगदंबा चौक परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल जाधव, प्रमोद जाधव, रोहन चौके, अक्षय चौके व ईतर ३ ते ४ लोक (सर्व रा. शेगाव) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. 

धिंड काढत मागायला लावली माफी 

अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी भाईगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सर्व आरोपींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. यानंतर या चौघांची त्याच परिसरातून पायी धिंड काढली आहे. एवढेच नव्हे तर भर चौकात कान पकडून माफी सुद्धा मागायला लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT