बुलढाणा: भ्रष्टाचाराची मूळ किती खोलपर्यंत आणि किती खालच्या पातळीवर रुजलेली आहेत हे बुलढाण्यातील (Buldhana) एका घटनेतून दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीची ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे डोनगाव ग्रामपंचायतीत नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ शिकवितानाचे CCTV फुटेज समोर आलं आहे.
या व्हिडीओमध्ये ग्रामपंचायत सचिव चनखोरे, महिला सरपंच रेखा पांडव, महिला सरपंचाचा पती रवी पांडव ,ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश घोगल व प्रदीप परमाळे असे सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसलेले असतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे.
पाहा व्हिडीओ -
यामध्ये ग्राम सचिव हा महिला सरपंचाला म्हणतो की, 'पावसाळा लागला की जनतेच्या प्रश्नावर आपण कान आणि डोळे बंद करून घ्यायचे व जस जळत तस जळू द्यायचं कारण जनता बदमाश आहे. शिवाय तुम्हाला जनतेने पैसे घेऊनच मतदान केलं आहे. एकाही चोराने फुकट मतदान केलं नाही, मतदान करणारे चोर आहेत. आपण इथं पैसे खाण्यासाठी बसलो असून पैसे खाणे हा आपला अधिकार आहे. यासर्व संभाषणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल आहे.
व्हिडीओमधून (Video) मेहकर तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे सरपंच व सरपंच पती यांना म्हणतात, पावसाळा लागला की आपण कान डोळे बंद करायचे जसं जळतं तसं जळू द्या कारण जनता बदमाश आहे. तुम्हाला जनतेने पैसे घेऊनच मतदान केले, एकाही चोराने फुकट मतदान केले नाही, मतदान करणारे चोर आहेत. आपण येथे पैसे खाण्यासाठी बसलो आहे , आपल्याला पैसे खाण्याचा अधिकार आहे.
हे संभाषण बाहेर आल्यावर आता ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य आक्रमक असून या सर्व प्रकाराची चौकशी करून या भ्रष्ट ग्रामसेवकावर कारवाईची मागणी आता होऊ लागली आहे. ग्रामसेवक म्हणतात की अशा सिसिटीव्ही मध्ये आवाज रेकॉर्ड होत नाही, या व्हिडीओचे एडिटिंग करून आवाज टाकला आहे असे खंडण चनखोरे यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.