Buldhana Crime Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण; नाकाबंदी तोडत कार सुसाट, अपहरणकर्त्याच्या कारचा अपघात झाल्याने फसला डाव

Buldhana News : अपहरण करणारे तीन जण पोलिसांनी पकडले. पकडलेल्यांपैकी दोन जण अल्पवयीन असल्याचे समजते. या सर्व घटनेदरम्यान मुलगी बेशुद्ध पडली होती. तिला मोताळ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले

संजय जाधव

बुलढाणा : मलकापूरहून एका सोळा वर्षीय युवतीचे अपहरण करण्यात आले. यानंतर तिला घेऊन जाणारी कार मोताळ्यात पोलिसांनी रोखली. दरम्यान पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पुढे सुसाट निघाली. पण गाडीचे टायर फुटले आणि सदर गाडी बाजूच्या एका शेतामध्ये जाऊन अपघातग्रस्त झाली. यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत मुलीची सुटका केली आहे. 

सदरचा थरारक प्रकार अपहरणाचा आहे की प्रेम प्रकरणाचा याचा तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत. दरम्यान मुलीचे अपहरण करण्यात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी मलकापूर पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून बोराखेडी पोलिसांना सुचित करण्यात आले होते. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी आज सकाळी नऊ वाजेपासून साक्षी हॉटेल जवळ आणि बोराखेडी फाटा अशा दोन ठिकाणी नाकाबंदी केली होती. 

नाकाबंदी तोडत गाडी नेली सुसाट 

दरम्यान लाल रंगाची कार साक्षी हॉटेल जवळ थांबवण्यात आली. परंतु अपहरण करणाऱ्या आरोपींनी गाडी थांबवण्याचे नाटक केले आणि पोलीस जवळ येत असल्याचे पाहून पुन्हा गाडी सुसाट पुढे नेली. तर बोराखेडी फाट्याजवळच्या नाकेबंदीला पण त्यांनी न जुमानता गाडी सुसाट वेगाने नेली. यानंतर पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला होता. 

टायर फुटून कार शेतात घुसली 

सदरची गाडी बुलढाण्याच्या दिशेने टाकली तेव्हा गाडीचे टायर फुटले आणि गाडी थेट शेतात घुसली. त्याठिकाणी सर्व आरोपीना ताब्यात घेण्यात आले. तर गाडीचा पिच्छा करणाऱ्या दुसऱ्या गाडीतील लोक अत्यंत आक्रमक होते. तिथे जमलेल्या काही जमावाने मिळून सदर कार जाळण्याचा प्रयत्न केला गेला. तर आरोपी मुलांना जबर मारहाण सुद्धा करण्यात आली. अर्थात हा प्रकार अपहरणाचा आहे का याबाबत प्राथमिक शंका व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT