buldhana Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

मध्यरात्री दरोडेखोर घरात शिरले; निर्दयीपणे लहान मुलाला पंख्याला लटवकले अन्...

बुलडाणा जिल्ह्यातील शिर्ला नेमाने शिवारात एका घरात सशस्त्र दरोड्याची घटना घडली आहे.मध्यरात्री साडेतीन वाजता ही घटना घडली आहे.

संजय जाधव

बुलडाणा : बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे . बुलडाणा जिल्ह्यातील शिर्ला नेमाने शिवारात एका घरात सशस्त्र दरोड्याची (Robbery) घटना घडली आहे. मध्यरात्री साडेतीन वाजता ही घटना घडली आहे. या घटनेने शिर्ला नेमाने गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Buldhana crime news In Marathi )

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील शिर्ला नेमाने या गावातील शेतात राहणाऱ्या पाचपोर कुटुंबीयांच्या घरात मध्यरात्री साडेतीन वाजता दरोडेखोर शिरले. मध्यरात्री घरात एकूण ८ ते १० सशस्त्र दरोडेखोर शिरले. घरात शिरताच त्यांनी कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचा घरातील सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटायचा डाव होता. त्यासाठी त्यांनी घरातील १० वर्षीय मंथन पाचपोर या बालकाला तीन वेळेस फासावर लटकावून घरातील लोकांना धमकावले.

दरोडेखोरांनी घरच्यांना धमकावत सोने चांदी कुठे ठेवले हे विचारलं. दरोडेखोरांनी लुटण्यासाठी मंथनला पंख्याला निर्दयीपणे लटकावून घरातील सदस्यांना धमकावत रोख रक्कम व ऐवज लुटला. ऐवज आणि रोख रक्कम लुटताच दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत १० वर्षीय मंथन सहित ६ जण जखमी झाले आहे.

दरम्यान, दरोड्याची घटना घडल्यानंतर घरातील एका सदस्याने पोलिसांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेत पाचपोर कुटुंबातील सहा जण जखमी असून एक गंभीर जखमी झाला आहे. या सदस्यांना अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शिर्ला नेमाने गावात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाचा तपास हिवरखेड पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT