buldhana court orders life imprisonment to youth  saam tv
महाराष्ट्र

बुलढाणा : गरबा दांडियामध्ये खूनी हल्ला करणा-या युवकास जन्मठेप

Buldhana Marathi News : पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या खटल्याचे कामकाज सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. एस.पी. हिवाळे यांनी काम पाहिले.

संजय जाधव

Buldhana :

बुलढाणा जिल्ह्यात सन 2016 मध्ये नवरात्राेत्सव काळात घडलेल्या एका हल्ला प्रकरणी पाेलिसांनी आराेपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सागर टेंभीकर असे शिक्षा सुनावलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याने गरबा उत्सवात चाकू हल्ला करुन चाैघांना गंभीर जखमी केले हाेते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सन 2016 मध्ये बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम मध्ये गरबा उत्सव सुरु असताना एका माथेफिरू युवकाने चाकूहल्ला करून चार युवकांना घायाळ केले होते. त्यानंतर जमावाने या युवकाला बेदम मारहाण केली होती. (Maharashtra News)

या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयाच उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या घटनेची पोलिसांत तक्रार नाेंदविण्यात आली हाेती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पडली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हल्लेखोर सागर टेंभीकर यास न्यायाधीश आर.एन. मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. एस.पी. हिवाळे यांनी काम पाहिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Pregnant : ५२ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार! बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे PHOTO अन् VIDEO व्हायरल

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Maharashtra News Live Update: बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT