dengue and chikungunya outbreak in buldhana Saam Digital
महाराष्ट्र

Buldhana News: काळजी घ्या! बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूचा कहर, ३८ रुग्णांना लागण, आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Buldhana Dengue Report: बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूने तोंडवर काढले असून जिल्ह्यात १५० पेक्षा जास्त रुग्ण डेंग्यूने बाधित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये ३८ रुग्णांना डेंग्यू ची लागण झाली आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २२ जुलै २०२४

राज्यामध्ये एकीकडे पावसाने धुमाकूळ घातला असताना साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर आता बुलढाणा जिल्ह्यातही डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली असून जिल्ह्यामध्ये १५० हून अधिक रुग्ण डेंग्यू बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूने तोंडवर काढले असून जिल्ह्यात १५० पेक्षा जास्त रुग्ण डेंग्यूने बाधित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये ३८ रुग्णांनाडेंग्यू ची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून ९३ रुग्ण डेंग्यू सदृश्य असल्याचे समोर आले आहे.तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात डेंग्यूने ग्रासलेले असंख्य रुग्ण उपचार घेत असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे.

चिखली तालुक्यातील रायपूर या गावात २०० पेक्षा जास्त ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली असून संपूर्ण गाव भयभीत झाले आहे. काल एकाचा मृत्यू सुद्धा झाला आहे त्यामुळे ग्रामस्थ दहशतीत दिसून येत आहे. मात्र त्या रुग्णाचा मेंदूज्वराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती हिवताप अधिकार्यांनी दिली आहे.

रायपूर गावात डेंग्यूेने थैमान घातले असून नागरिकाणी संपूर्ण एक दिवस कोरडा पाळन्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, या विषयी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देत हलगर्जीपणा दाखवला आहे एक महिन्यापासून रायपूर गावांत डेंग्यूने थैमान घातलेले असताना अद्याप पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही त्यामुळे रायपूर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Fatty Liver Disease: देशातील 38% लोक फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त, शरीरात दिसणारी ही 5 लक्षणं ओळखा

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT