BJP MLA Shweta Mahale Saam TV
महाराष्ट्र

आवाज बंद करा, मी बोलत असताना मध्ये-मध्ये बोलू नका; भर बैठकीत भाजप महिला आमदार संतापल्या

बैठकीत उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी महाले यांना शांत केलं.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव

बुलडाणा : बुलडाण्यातील (Buldhana) भाजप आमदार श्वेता महाले (BJP MLA Shweta Mahale) यांनी भर बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना खडसावलं. आवाज बंद करा मी बोलत असताना मध्ये-मध्ये बोलू नका असा दमच आमदार श्वेता महाले यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला. बुलडाणा जिल्ह्यात कृषी केंद्र चालकांकडून खतांचे लिंकिंग होत आहे. त्यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या दिवसात अडचणीत सापडला आहे (Buldhana BJP MLA Shweta Mahale latest News)

आमदार श्वेता महाले यांनी चिखली मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी, कृषी कंपन्या चे प्रतिनिधी सोबत एक बैठक आयोजित केली होती. बैठकीत आमदार महाले यांनी खतांची लिंकिंग न करण्याच्या सूचना केल्या आणि जर असे झाले तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सुद्धा कृषी विभागाकडे केली.

मात्र बैठक सुरू असताना आमदार महाले यांनी भर बैठकीत जिल्हा परिषदच्या कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांना चांगलेच झापलं. आमदार महाले ह्या कृषी अधिकाऱ्यांना दुकानदार कसे लिंकिंग करतात याचा पुरावा दाखवत असतानाच कृषी अधिकारी अनीसा महाबळे ह्या मधेच बोलायला लागल्या. त्यामुळे याच गोष्टीचा महाले यांना राग आला. आणि त्यांनी भर बैठकीत "आवाज बंद करा तुम्ही झोपा काढत होतात का?" , असं म्हणत अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं.

दरम्यान, बैठकीत उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी महाले यांना शांत केलं. यावेळी सभागृहात शांतता पसरली होती. मात्र, आमदार महाले यांनी भर सभागृहात अधिकाऱ्यांना झापल्याने इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्गात नाराजी पसरली असल्याची बुलडाण्यात चर्चा आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT