BULDHANA BIODIESEL TANK ACCIDENT TWO YOUTHS DEAD, ONE CRITICALLY INJURED 
महाराष्ट्र

Buldhana : बुलढाण्यात आक्रीत घडलं, बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून २ तरुणांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ

Biodiesel Tank Tragedy: बुलढाण्यातील बायोडिझेल पंपावर अपघात घडला. टाकीत पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून आपत्कालीन सेवा तातडीने दाखल झाल्या.

Dhanshri Shintre

मलकापूर तालुक्यातील नायगाव फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जुना ६ व आताचा ५३ वर असलेल्या एका बायोडिझेल पंपावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. या घटनेत दोन तरुणांचा टाकीत गुदमरून मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

मृतांमध्ये साजिद खान जलील खान (२२) आणि मुस्ताक खान जब्बार खान (३८) यांचा समावेश असून, आरिफ खान बशिर खान (३८) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. हे तिघेही पारपेठ, मलकापूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, याच बायोडिझेल पंपाच्या टाकीत दीड वर्षांपूर्वीही अशीच गुदमरून झालेली मृत्यूची घटना घडली होती. त्या अपघातानंतर प्रशासनाने पंप बंद करून ‘सील’ केला होता. मात्र काही दिवसांत परत पंप सुरु करण्यात आला आणि पुन्हा एकदा त्याच टाकीत जीवघेणा प्रकार घडल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्या टाकीने आधी एकाचे प्राण घेतले होते, त्याच टाकीत पुन्हा जीव गमवावा लागला, ही बाब नागरिकांना हादरवून टाकणारी ठरली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. या निष्काळजीपणामुळे दोन निष्पापांचा जीव गेला आणि एक जण मृत्यूसोबत झुंज देत आहे.

या घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तातडीने याची दखल घेतली आहे. त्यांनी सर्व अवैध बायोडिझेल पंप तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून, कठोर कारवाई करण्याच्या स्वच्छ सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. यानंतर जिल्ह्यातील बेकायदेशीर पंपांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनीही प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, पुन्हा कोणीही बळी जाण्यापूर्वी या टाक्यांवर आणि बेकायदेशीर पंपांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT