Buldana Accident Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक; ६ जणांची प्रकृती गंभीर

Truck Hit Rickshaw: बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. अंत्यसंस्कारावरून परताणाऱ्या रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली आहे.

Rohini Gudaghe

संजय जाधव, साम टिव्ही बुलडाणा प्रतिनिधी

बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. अंत्यसंस्कारावरून परताणाऱ्या रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती (Buldhana Accident) मिळत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर नांदुरा खामगाव दरम्यान भरधाव ट्रकने रिक्षाला धडक (Truck Hit Rickshaw) दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वाहनांचा चक्काचूर झालाय. तर आठजण जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रकृती चिंताजनक असलेल्या जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. शेगाव येथून मलकापूरकडे अंत्यसंस्करासाठी रिक्षाने जात असताना हा (Accident On National Highway) अपघात झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळित झाली होती.

हिंगोलीमध्ये अपघात

हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहुली पाटीजवळ २७ एप्रिल रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात ज्ञात वाहनाच्या धडकेत (Accident News) दोन तरूणांनी त्यांचा जीव गमावला होता. हा अपघात झाल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिली होती. वैभव पाटील आणि शुभम पारसकर, अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे होती.

हे तरुण खासगी कामानिमित्त सेनगाव मध्ये गेले खाजगी कामानिमित्त हिंगोलीवरून सेनगावला गेले होते. हिंगोली शहराजवळ असलेल्या (Road Accident News) राहुल पाटीजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत दोन्ही तरुणांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी त्यांचे मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT