Buldhana News  Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Accident News : मलकापूरमध्ये दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Buldhana Accident News : शेख अमीन शेख हनिफ, शेख रशीद शेख कालू यांचा मृत्यू झाला. तर सलीम खा बुढन खा हा जखमी झाला आहे. तर जखमीवर मलकापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव

Buldhana News :

बुलडाणा येथे दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मलकापूर तालुक्यातील पिंपरी गवळी रोडवरील दाभाडी फाट्याजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

शनिवारी रात्रीच्या सुमरासा हा अपघात घडला आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले असून एक जण जखमी आहे. दुचाकीस्वार शेख रशीद शेख कालू (वय ५५ ), शेख अमीन शेख हनिफ (वय ४७), सलीम खा बुढन खा (वय ३०) हे तिघे मलकापूर येथून मिस्त्री काम करून आपल्या गावी माकोडीकडे परत येत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान दाताळा पिंपरी गवळी रोडवरील दाभाडी येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये शेख अमीन शेख हनिफ, शेख रशीद शेख कालू यांचा मृत्यू झाला. तर सलीम खा बुढन खा हा जखमी झाला आहे. तर जखमीवर मलकापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT