Malkapur Accident Saam tv
महाराष्ट्र

Malkapur Accident : गॅस टँकर व कंटेनरची समोरासमोर धडक; मोठी दुर्घटना टळली, अपघातात दोघे गंभीर जखमी

Buldhana News : राष्ट्रीय महामार्गवर मलकापूरजवळ अनेक वर्षापासून रखडलेला रेल्वे फ्लायओव्हर वरून रॉंग साईडने वाहतूक सुरू आहे. रॉंग साईडने आलेला एलपीजी गॅस टँकर समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस टँकर व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान गॅस कंटेनर असल्याने अपघातात गॅस लिकेज न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघातानंतर मात्र महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मलकापूरजवळ अनेक वर्षापासून रखडलेला रेल्वे फ्लायओव्हर वरून रॉंग साईडने वाहतूक सुरू आहे. अशातच रॉंग साईडने आलेला एलपीजी गॅस टँकर समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक झाली. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातग्रस्त वाहनांना आग लागली नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 

गेल्या वर्षभरात याच ठिकाणी रॉंग साईडने आलेले वाहन समोरून येणाऱ्या वाहनांना धडकुन अनेक अपघात झाले आहेत. मात्र अद्यापही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम अपूर्णच असल्याने नेहमी अपघात होत असतात. आज झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जयपूर- अजमेर महामार्गावरील घटनेची पुनरावृत्ती टळली

राजस्थानच्या जयपूर- अजमेर महामार्गावर वाहनांची भीषण धडक झाली होती. यात दोन्ही वाहनांना आग लागल्याने भीषण स्फोट झाला होता. यात अनेकांचा जीव गेला होता. दरम्यान मालकापूरजवळ आज सकाळच्या सुमारास झालेल्या कंटेनर व गॅस टँकरची धडक झाली. मात्र सुदैवाने आग न लागल्याने जयपूर- अजमेर महामार्गावरील घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT