Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : आजी- आजोबांदेखत दोन्ही नातवांचा मृत्यू, शेगावजवळ भीषण अपघात, संतप्त जमावाने डंपर पेटविले

Buldhana News : सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथून प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती- पत्नी आपल्या दोन नातवंडांना घेऊन शेगावकडे निघाले होते

संजय जाधव

बुलढाणा : पळशी सुपो येथून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला भेंडवळ जवळील माऊली फाटा येथे भरधाव जाणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. यामध्ये मोटरसायकल वरील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघातानंतर जमाव रस्त्यावर उतरला होता. यानंतर संतप्त जमावाने डंपरला पेटवून दिले होते. 

बुलढाणा जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे. उन्हाळ्याची सुट्यांमध्ये आजी- आजोबांकडे आलेले पार्थ चोपडे (वय ६) व युवराज भागवत (वय ६) असे अपघातात मृत झालेल्या चिमुकल्यांनी नावे आहेत. दरम्यान आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथून प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती- पत्नी आपल्या दोन नातवंडांना घेऊन शेगावकडे निघाले होते. 

डंपरची मागून जोरदार धडक 

अमरावती येथील पार्थ चोपडे (वय ६) व बडनेरा येथे राहणारा युवराज मोहन भागवत (वय ५) हे दोघे आजी- आजोबांसोबत मोटरसायकलने शेगावकडे निघाले होते. दरम्यान माऊली फाटा येथे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने मोटरसायकलला मागून जोरदार धडक देत चिरडले. धडक जोरदार असल्याने मोटारसायकल वरील चौघेजण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातामध्ये दोन्ही नातवंडांचा जागीच मृत्यू झाला. तर आजी आणि आजोबा गंभीरित्या जखमी झाली आहेत. 

संतप्त जमावाने डंपरला लावली आग 

अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन चिमुकल्याच्या मृत्यू जमाव संतप्त झाला होता. यानंतर संतप्त जमावाने डंपरमध्ये आग लावून दिली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांसह खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर आग विझवत जमावाला पांगविले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT