Buldana Accident Saam TV
महाराष्ट्र

Buldana Accident : मोठी बातमी! राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर दोन ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी

विटांनी भरलेल्या ट्रकची व दुसऱ्या ट्रकला धडक लगल्याने या अपघातात तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव

Buldana Accident News : बुलढाणा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर तांदुळवाडी पुलावर दोन ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालायं. तसेच तीन जण गंभीर जखमी झालेत. (Latest Buldana Accident News )

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर तांदुळवाडी पुलावर विटांनी भरलेला एक ट्रक जात होता. यावेळी समोरुन येणाऱ्या दुसऱ्या ट्रकची या ट्रकला जोरात धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, ४ जणांचा यामध्ये मृत्यू झाला.

विटांनी भरलेल्या ट्रकची व दुसऱ्या ट्रकला धडक लगल्याने या अपघातात तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात. जखमींना मलकापूर येथे कुटीर रुग्णालय हलविण्यात आलं आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या भीषण अपघातात विटांनी भरलेल्या ट्रकचा पुढील भाग चिरडला गेला. ट्रकला समोरून जोरात धडक बसल्याने समोरील काचा फुटल्या तसेच ट्रक वाहन चालकाचा यात जागीच मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg: 'समृद्धी' महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जेरबंद, आरोपीचा फोटो समोर

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधी भिमाशंकर मार्गावरील खड्डे बुजवण्याची लगबग

Mumbai Tourism: 1 दिवसाच्या सुट्टीत फिरण्याचा प्लान करताय? मुंबईपासून फक्त 180 किमी दूर असलेल्या 'या' धबधब्यावर भिजून याच

वनविभागाच्या जागेत कापूस-तुरीच्या आड गांजाची शेती; पोलिसांचा छापा अन् 82 लाखांचा माल जप्त

Toxic Collection: यशच्या 'टॉक्सिक'ची क्रेझ ५ दिवसांत ओसरली? २०० कोटींची कमाई, पण रविवारी थिएटरमध्ये शुकशुकाट

SCROLL FOR NEXT