ओ शेठ नादच केला थेट; लग्नासाठी नवरदेव चक्क हेलिकॉप्टरमधून रवाना Saam TV
महाराष्ट्र

ओ शेठ नादच केला थेट; लग्नासाठी नवरदेव चक्क हेलिकॉप्टरमधून रवाना

याठिकाणी नवरदेव रोशन म्हात्रे हे खाजगी हेलिकॉप्टरमधून डोंबिवलीकडे रवाना झाले आहे.

चेतन इंगळे

मीरा- भाईंदर : हौस म्हटलं की माणूस काय करेल यांचा नेम नाही असंच काहीसं चित्र भाईंदर मध्ये पाहायला मिळाले. लग्न सोहळ्यासाठी चक्क नवरदेव हेलिकॉप्टरने डोंबिवलीकडे रवाना झाला आहे, यावेळी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लहान मुलांसह अनेक नागरिकांनी गर्दी केली. भाईंदर पूर्वेच्या गोडदेव गावामधील म्हात्रे कुटुंबातील रोशन म्हात्रे यांचे लग्न सोहळा डोंबिवली येथे संपन्न होणार आहे. याठिकाणी नवरदेव रोशन म्हात्रे हे खाजगी हेलिकॉप्टरमधून डोंबिवलीकडे रवाना झाले आहे.

लग्न म्हटलं की खर्च खूप पण लग्नासाठी कुटुंबातील सदस्य मागे पाहत नाही तशीच प्रचिती म्हात्रे कुटूंबात पाहायला मिळाली.लग्ना मध्ये अनेक नवरदेव गाडी,घोड्यावर स्वार होताना पाहत असतो परंतु अनेक जणांचे स्वप्न असते की हेलिकॉप्टरचा प्रवास आयुष्यात झाला की एखादं मोठं स्वप्न पूर्ण झाल्या सारखे वाटते.रोशन म्हात्रे हे मीरा भाईंदरचे माजी महापौर स्व.तुलशीदास म्हात्रे यांचा पुतणे आहेत.म्हात्रे परिवार हे मूळ भूमिपुत्र आहेत त्यामुळे जमिनी शेती आणि आर्थिक दृष्ट्या ही भक्कम आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला सदस्यावर जीवघेणा हल्ला

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT