संजय राऊत यांच्या सरन्यायाधीशांवरील वक्तव्यामुळे न्यायालयीन अवमानाचा मुद्दा चर्चेत
इंडिया आघाडीच्या मोर्चात त्यांनी लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले
न्यायालयाने त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊन नोटीस बजावली
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सरन्यायाधीशांची माफी मागितली
एसआयआर घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षाने सरकारला घेरले. गेले काही दिवस याचं मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलने केली गेली. दरम्यान इंडिया आघाडीकडून काढलेल्या मोर्चामध्ये उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीश यांच्याबद्दल टिप्पणी केली. या टिपण्णीनंतर राऊत यांनी केलेल्या विधानाची दखल घेत न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान आता राऊत यांनी पत्रकार परीषदेत सरन्यायाधीशांची माफी मागितली.या प्रकरणात न्यायालयाच्या फौजदारी अवमानाची कारवाई सुरू करण्यासाठी अॅटर्नी जनरल यांनी संमती दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणूक आयोगाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा मुद्दा उपस्थित झाला. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी न्यायालयाबाबत केलेल्या विधानांवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी संबंधित याचिकाकर्त्याला आपल्या वर्तनाचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे स्पष्ट केले. राऊत यांच्या वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आल्याने या प्रकरणाला आता कायदेशीर महत्त्व प्राप्त झाले आहे.
इंडिया आघाडीच्या रॅलीत बोलताना संजय राऊत यांनी देशातील लोकशाही, निवडणुका आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. देशात हुकूमशाहीसदृश परिस्थिती असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असल्याचा दावा केला होता. अशा परिस्थितीत विरोधकांना भेटण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याची टीकाही त्यांनी केली होती.याशिवाय, लोकशाहीच्या संरक्षणासाठी न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी गेल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांचे भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी आपल्या भाषणात केला होता. न्यायाधीश भाजप नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळतात आणि राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहतात, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या विधानांमुळे न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणानंतर राऊत यांनी आज न्यायालयाची माफी मागितली. राऊत म्हणाले,मी सुप्रीम कोर्टाला मानतो, सुप्रीम कोर्टाची माफी मागायला काही हरकत नाही मी माफी मागतो.सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती नंतर सर्वात महत्वाची संविधानिक गोष्ट आहे. सामान्य जनता सुप्रीम कोर्टाच्या दारात उभी राहून न्याय मागते, त्यामुळे आशेचा शेवटचा किरण सुप्रीम कोर्ट आहे. आम्हाला न्याय द्या, अंकिता भंडारी प्रकरणात तसेच ४ वर्ष आम्ही शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी लढत आहोत आम्हाला न्याय मिळाला नाही, आम्ही न्याय मागत आहोत." असे राऊत यांनी म्हटले. दरम्यान या प्रकरणाला आता कोणते नवे वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.