Breaking News police action against 42 nylon manja sellers Saam TV
महाराष्ट्र

Breaking News: बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करणं भोवलं, नाशिकमध्ये ४२ जणांवर तडीपारीची कारवाई

Satish Daud

Nashik Breaking News

नायलॉन मांजा विक्रीस बंदी असताना प्रशासनाचे आदेश झुगारून सर्रास मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना नाशिक पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. शहरातील तब्बल ४२ मांजा विक्रेत्यांना तडीपार करण्यात आलं आहे. शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होतो. मांजामुळे अनेकजण जखमी झाल्याच्या घटना समोर येत आहे. यामध्ये काहींना प्राणही गमवावे लागत आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यभरात मांजा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी देखील २३ जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा विक्री व वापरावर मनाई आदेश जारी केले आहेत. तरी देखील शहरात छुप्या पद्धतीने मांजाची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, नायलॉन मांजा विक्री करताना सापळ्यात सापडलेल्या ४२ संशयित विक्रेत्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील ४२ जणांचे तडीपारीचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये आडगाव परिसरात ३, म्हसरूळ २, पंचवटी, २, भद्रकाली ५, सरकारवाडा ८, गंगापूर ५, मुंबईनाका ५,सातपूर १, अंबड २, इंदिरानगर ३, उपनगर ३, नाशिकरोड २, देवळाली कॅम्प परिसरातील एका जणाचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT