Eknath Shinde Shivsena Major Seatback Parbhani Pathri News  AI Image
महाराष्ट्र

Breaking News : राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेनेच्या २ नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवार गटात करणार प्रवेश

Parbhani Political News : परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपालिकेत शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत दोन नगरसेवकांनी पदाचा राजीनामा देत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

Alisha Khedekar

परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. नगरपालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नऊ नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षालाही सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पाथरीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पाथरी नगरपालिकेत नगराध्यक्षांसह शिवसेना शिंदे गटाचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, आता याच गटातील दोन नगरसेवकांनी वेगळा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आपण राजीनामा देत असल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ७ ब मधून निवडून आलेले पठाण हसीब खान तहजीब खान आणि आलम तरन्नुम बेगम मुजीब यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा सादर केला. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचा सदस्य म्हणूनही यापुढे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले.

नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या कथित भ्रष्ट कारभाराला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे दोन्ही नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे पाथरी नगरपालिकेतील सत्ताधारी गटात नाराजी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, राजीनामा दिल्यानंतर हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात पाथरीच्या राजकारणात आणखी काही बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. या घडामोडींचा नगरपालिकेच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी तपासाला पुन्हा वेग!

Solapur Airport : सोलापूर विमानतळावर दुर्घटना, उड्डाण घेतानाच विमान घसरलं

Cancer: 10 वर्षांत कॅन्सरचा आजार पूर्णपणे संपणार? काय आहे तज्ज्ञांचं मत?

लठ्ठ महिलांसाठी साड्यांचे बेस्ट कलेक्शन, या 5 डिझाईन्स नक्की आवडतील

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षा रक्षकांची दादागिरी? मंदिरातच भाविकांना बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT