Kolhapur- Ratnagiri Accident News:  Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती- पत्नीचा करुण अंत; कोल्हापुरमधील घटना

Kolhapur- Ratnagiri Accident News: कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती- पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर| ता. ८ जून २०२४

कोल्हापुरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे इथे डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती - पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मारुती रामचंद्र महाजन आणि सुगंधा मारुती महाजन हे आपल्या ॲक्टीव्हा गाडीवरुन निघाले होते. यावेळी बोरपाडळे इथे त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. डंपरवरील चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोल्हापुर शहरात हीट अँड रन अपघात समोर आला होता. शहरातील चौकात एका भरधाव कारने सहा ते सात वाहनांना चिरडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीची मोजणी करण्यासाठी स्कायमेट कुठून शेतकऱ्यांची दिशाभूल

Diwali Car Offers: दिवाळी धमाका! मारुती कंपनीच्या 'या' कारवर तब्बल 2 लाखांपर्यंतची सूट

'बदला घेतल्याशिवाय राहणार नाही'; रिलस्टार भैय्या गायकवाडचा VIDEO व्हायरल, मारहाण करणाऱ्यांना थेट धमकी

Farmer : अतिवृष्टीमुळे बेजार; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, कारीत पंधरा दिवसात दुसरी घटना

Abhang Tukaram: हा मराठी अभिनेता झळकणार खलनायक अवतारात; 'अभंग तुकाराम'मध्ये साकारणार खास भूमिका

SCROLL FOR NEXT