bjp mla mahesh baldi  AI Image
महाराष्ट्र

Political News : हिवाळी अधिवेशनाआधी महेश बालदींची आमदारकी धोक्यात? कारवाईची कोणी केली मागणी, काय आहे कायदा?

Maharashtra Political News : भाजप आमदार महेश बालदी यांना अलिबाग न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यानंतर रोहिणी खडसे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बालदी यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

भाजप आमदार महेश बालदी यांना अलिबाग न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एका महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करणे आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी बालदी यांच्या आमदारकीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

रोहिणी खडसे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे महेश बालदी यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधी अपात्र ठरू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

येत्या काही दिवसांत विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच या प्रकरणात योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. विधानसभेची प्रतिष्ठा आणि सभागृहाची प्रतिमा जपणे ही विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी आहे. त्यामुळे कायद्यानुसार महेश बालदी यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या मुद्द्यावर बोलताना रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिक्षा झाल्यानंतरही संबंधित आमदार सभागृहात कसे राहू शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अशा प्रकरणांमध्ये कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि कोणालाही विशेष सवलत मिळू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, महेश बालदी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे आता त्यांच्या आमदारकीबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रोहिणी खडसे यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टला बॉम्बनं उडवून टाकू; पंजाबी पॉपस्टार खलिस्तानीच्या निशाण्यावर

WhatsApp Web Security : WhatsApp वापरताय? सावधान! एका चुकीमुळे तुमचे खासगी मेसेज होऊ शकतात लीक

Maharashtra News Live Update: कुर्ला एल विभागाचा गेट आंदोलकांनी अडवला

फक्त पुण्यातच! फाटके कपडे परत देणाऱ्या पतीला पत्नीचा दणका; सोन्याच्या व्यवहारासाठी थेट सराफालाच आणले कोर्टात

Navi Mumbai: कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आरोपीने थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT