Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi Live News Updates : विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक

Maharashtra Breaking LIVE Marathi Updates 6th july : राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट, महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन, पंतप्रधान नरेंद्र मोदी , हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण, राहुल गांधी

Vishal Gangurde

Mahayuti : विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक.होत असून विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते सुरू आहेत. महायुतीचे ९ उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज सुरू आहे. मविआने तीन उमेदवार दिल्याने विधानपरिषद निवडणुकीची रंगत वाढली वाढली आहे.

CM Eknath Shinde : फसवणूक एकदाच होते, नेहमीनेहमी नाही, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकूीचा प्रचार केल्याचा शिंदेंचा आरोप

60 टक्के मतदान झालं असतं तर 40 जागा आल्या असत्या. फसवणूक एकदाच होते नेहमीनेहमी नाही. नाना पटोले यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. तुम्ही डोक्यावर पडला काय ? बोफोर्स पासून शेणापर्यंत तुम्ही पैसे खाल्लेत. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का ?, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोलेंवर केला.

Ajit Pawar : अजित पवार संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत चालत जाणार

अजित पवार सकाळी आठ वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत चालत जाणार आहेत. शरद पवार उद्या दुपारी पिंपळी लिंमटेक येथे संविधान समता दिंडीत सहभागी होतील. काटेवाडीत परिट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांचे स्वागत केले जाणार आहे. दुपारच्या विसाव्यानंतर तुकोबांच्या पालखीच मेंढी रिंगण होणार असून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी उद्या दिवसभर लोणंद येथेच मुक्कामी आहे.

Mahayuti : महायुतीत समन्वय राखण्यात अपयश,  अजित पवारांची जाहीर कबुली

विभागनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय समन्वय साधण्याचं ठरवलं होतं पण ते झालं नाही. महायुतीत समन्वय राखण्यात अपयश आल्याची अजित पवारांनी जाहीर कबुली दिली. आता समन्वय राखण्यासाठी लगेच कामाला लागू, असं अजित पवारांनी फडणवीस आणि शिंदेंना आवाहन केलं.

Shiv Sena UBT : धारावी पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाच आंदोलन

माजी नगरसेवकाला पोलिसांनी मारहाण केल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून धारावी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. अपघातच प्रकरण मिटवण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेवकाला मारहाण झाल्याचा ठाकरे गटाने आरपो केला आहे.

Mahayuti Manomilan Melava :  महायुतीकडून 'मनोमिलन'; घटकपक्षांचा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात थोड्याच वेळात मेळावा

लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नेते आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. थोड्याच वेळात सुरू होणाऱ्या या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महायुतीचे नेते मार्गदर्शन करणार आहेत.

Budget Session : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार अर्थसंकल्प

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार आहे. २३ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. निर्मला सीतारमण सलग सातव्यांदा सादर करतील. २२ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे.

महिला पोलिसाला पेटवून देण्याचा प्रयत्न, आरोपीला पोलीस कोठडी  

पुणे

महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्यास पेटवून देण्याच्या प्रयत्न

आरोपी संजय फकीरा साळवे याला कोर्टात केला हजर

पुणे न्यायालयाने आरोपी साळवे याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची BMC ला अचानक भेट, अधिकाऱ्यांना दिली तंबी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महापालिकेच्या ए वाॅर्ड कार्यालयाला अचानक भेट दिली. स्थानिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जात आहेत याचा आढावा घेतला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इतका वेळ का लागतोय? वेळेच्या वेळेत नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या.

Manoj Jarange Patil : कुणबी मराठ्यांची पोट जात, मग आरक्षण का नाही, मनोज जरांगेंचा सवाल

कुणबी मराठ्यांची पोट जात मराठा आहे मग आरक्षण का नाही, असा सवाल मनोज जरांगें पाटील यांनी केला आहे. हैद्राबाद गॅझेट लागू करा,आता पर्यंत ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत सरकारने लेखी दिलंय ,तरी पण आम्हाला आरक्षण देत नसल्याचं खंत त्यांनी व्यक्त केली.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी फुंकलं विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग; बुलडाण्यात ६ जागांवर स्वतंत्र उमेदवार

बुलडाणा :

बुलडाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार उभे करणार

रविकांत तुपकर यांनी आजच्या बैठकीत घेतला निर्णय

रविकांत तुपकर यांची विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा

तुपकर यांनी आज बोलावली होती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक

जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा, खामगाव, जळगांव जामोद, मेहकरमधून लढणार

आजपासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे तुपकरांचे आदेश

Pune - Bengaluru Highway Traffic : पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Kolhapur Traffic News

कोल्हापुरातील किनी टोलनाकानजीकच्या घुणकी येथे वाहतूक कोंडी

ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी

महामार्गावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला मराठा बांधवाचा मोठा सहभाग

मनोज जरांगे पाटील यांच्या हिंगोलीमधील रॅलीमध्ये मराठा बांधवांनी मोठा सहभागी नोंदवला आहे. शासकीय विश्रामगृह , इंदिरा चौक , शिवाजी महाराज पुतळा परीसर गर्दीने भरला आहे.

Solapur News : सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाचा मंडप उडाला

आई प्रतिष्ठानच्या वतीने सोलापुरातील सेटलमेन्ट भागात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विद्यार्थिनींना मोफत साहित्य वाटप करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात चंद्रकांत पाटील भाषण करताना अचानक वादळी वारा आला आणि मंडप हवेत उडाला. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. अखेर उडालेल्या मंडपात आणि बरसणाऱ्या पावसात छत्री लावून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाषण उरकलं

Pune News : पुण्यातील दिवेघाटात भरदिवसा बिबट्याचे दर्शन; VIDEO व्हायरल

दिवेघाटात काल प्रवाश्याना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या दिसल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना स्थानिक ग्रामस्थांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

मागील दोन दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत होते. मात्र कोणाकडे असा फोटो किंवा चित्रीकरण आढळले नाही. तरीही ग्रामस्थ सावधगिरी बाळगून होते.

सासवडकडून वडकीकडे येताना घाटाच्या उताराला वडकीपासून तिसऱ्या वळणावर बिबट्या डोंगरावरून उतरून अचानक झाडांमध्ये जाताना वडकीतील नागरिकांना दिसला. बिबट्या रस्ता ओलांडताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याने प्रवाश्यांमध्ये घबराट झाली. या थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये महिला आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच स्वयंपाक

दूध आणि कांदा प्रश्न घेऊन गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असूनआंदोलनात आज शेतकरी महिला भगिनी सामील झाल्या आहेत.

या शेतकरी महिलांनी चूल पेटवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच स्वयंपाक सुरू केला आहे. त्यामुळे शहरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने लवकर दखल घेतली नाही तर हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.

Laxman Hake News : ओबीसीतून आरक्षण घेतलं तर तुमची गरीबी हटणार हे तुम्हाला कुणी सांगितलं? लक्ष्मण हाकेंचा सवाल

मराठा बांधवांवर बेरोजगाराची वेळ आली. त्यांना नोकरी नाही. याला ओबीसी आरक्षण जबाबदार नाही. मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याने त्यांची परिस्थिती लगेच बदलणार नाही, असं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

तुम्ही ओबीसीतून आरक्षण घेतलं तर तुमची गरीबी हटणार हे तुम्हाला कुणी सांगितलं, असा सवालही हाके यांनी मराठा आंदोलकांना उपस्थित केला आहे. ⁠संविधानला आव्हानं देण्याची भाषा करणे योग्य नाही, अशी टीकाही त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली आहे. ओबीसी समाज आजही सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेत आहे, असंही हाके म्हणाले.

Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर 

बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या आज बारामती दौऱ्यावरती आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सांत्वन पर भेटी दिल्या. यानंतर सुळे यांनी वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने देहू ते पंढरपूर पालखी महामार्गावर आषाढी वारीत करीत गेल्या 14 वर्षापासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी सोनियाजी गांधी फिरता मोफत दवाखान्याला भेट दिली.

Nashik News: भीषण अपघात!  कार थेट गोदावरी नदीत, एकाचा मृत्यू 

गोदावरी नदीच्या पुलाजवळ भीषण अपघात झालाय. हॉटेल गंमत जम्मत परिसरातील अपघात झाल्याचं समोर आलंय. रात्रीच्या अंधारात कार थेट गोदावरी नदीत गेली. यात एका तरूणाचा मृत्यू झालाय.

Ajit Pawar News:  पक्षामार्फत सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणार, १० आणि २२ जूलै रोजी विशेष शिबीरांचं आयोजन

अजित पवार यांच्या पक्षामार्फत सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. १० जुलै सुनिल तटकरे यांचा वाढदिवस आणि २२ जुलैला अजित पवारांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी विविध ठिकाणी शिबिर घेतले जाईल. लाडकी बहिण योजनेसाठी शिबिर घेतलं जाणार आहे.

Pandharpur News: व्हीआयपी दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात गर्दी, भाविकांमधून तीव्र संताप

व्हीआयपी दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात गर्दी झालीय. दर्शन रांगेतील भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आषाढीसाठी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठी गर्दी झालीय. दोन किलोमीटर अंतरापर्यंत दर्शनाची रांग लागली आहे.

Palghar Accident: लक्झरी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात;  एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

विक्रमगड पाली रोडवर वसुरीजवळ लक्झरी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झालेत. विक्रमगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. लक्झरी बस ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झालाय.

Pune breaking:  माऊलींचा दुपारचा विसावा नीरेत,  त्यानंतर पालखी लोणंदकडे प्रस्थान करणार

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नीरा येथे दाखल झालीय. माऊलींचा दुपारचा विसावा नीरेत आहे. विसावा झाल्यानंतर माऊलींच होणार शाही नीरा स्नान होणार आहे. पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊली आज सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर पालखी लोणंदकडे प्रस्थान करणार आहे.

Nagpur News: महिला काँग्रेसकडून भारत जोडो धर्मनिरपेक्ष यात्रा, नाना पटोलेंची उपस्थिती 

नागपूरात महिला काँग्रेसकडून भारत जोडो धर्मनिरपेक्ष यात्रा काढण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत महिला काँग्रेसच्या यात्रेला सुरवात झाली. ही यात्रा दीक्षाभूमी येथून सुरवात करण्यात आली असून दीक्षाभूमी, गणेश टेकडी मंदिर, लुथर चर्च, कामठी रोड गुरुद्वारा, कोराडी येथील देवी मंदिर, वाकी दरगाह सह्या सर्वच धार्मिक स्थळी ही यात्रा जाईल.

Raigad Breaking: रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटन संदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी

रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटन संदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. माणगाव तालुक्यातील ताम्हाणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकूंड धबधबा इथं प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. माणगावचे प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी आदेश दिलेत.

Delhi Breaking:  दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचा मुक्काम तिहार जेलमध्येच,  कथित दारू घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत वाढ

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्या प्रकरणी मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. 15 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली आहे.

Nashik Breaking: नाशिकमध्ये गंगा गोदावरी पुरोहित संघ आक्रमक; रामकुंड परिसरात ठिय्या आंदोलन  

नाशिकमध्ये गंगा गोदावरी पुरोहित संघ आक्रमक झाला आहे. रामकुंड परिसरात पुरोहित संघाचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान पोलीस आणि पुरोहित संघात शाब्दिक बाचाबाची झालीय. रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने घाटावर होणाऱ्या बांधकामाविरोधात आंदोलन करत आहे.

Elections News: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरण,  सुप्रीम कोर्टात १२ जुलै रोजी सुनावणी  

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका मागच्या काही वर्षांपासून झालेल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्याने सुप्रीम कोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिली होती.

Congress News : दिल्लीत काँग्रेसची खलबतं, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक

दिल्लीतल्या बैठकीनंतर काँग्रेसची राज्यात 12 तारखेला महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक असणार आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथला यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे.

Ajit Pawar Group : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला घरघर, काही कार्यकर्ते शरद पवारांकडे परत येणार

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला घरघर लागल्याचे पाहायाला मिळत आहे. अजित पवारांचे अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते शरद पवारांकडे परत येणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

Gadchiroli News : गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून स्फोट, दोन जवान किरकोळ जखमी

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील धोडराज येथून नक्षल अभियानावरून परत येत असलेल्या C-60 जवानांवर आयडी स्फोट

या स्फोटात दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा

धोडराज-भामरागड पुलाजवळ नक्षलवाद्यांनी लोखंडी क्लेमोरने स्फोट.

दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या

chhatrapati sambhajinagar accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धुळे-सोलापूर हायवे रस्त्यावर माळीवाडा- फतियाबाद परिसरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

Amarnath yatra 2024 :  मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात केली आहे. प्रशासनाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अमरनाथ यात्रेकडे जाणारे दोन्ही बाजूंचे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. पहलगाम आणि बालटल भागाकडून जाणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुढील 24 तासात काश्मीर खोऱ्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Milk Farmer youth Hunger strike : अहमदनगरमध्ये दूध दरासाठी शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण

अहमदनगरमध्ये दूध दरासाठी शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सुरु केलं आहे. अकोले तालुक्यातील गणोरे गावात शुभम आंबरे आणि संदिप दराडे या तरुणांचे उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. दूधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी या तरुणांची आहे. या तरुणांच्या समर्थनासाठी परिसरातील गावे एकवटली आहेत. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गणोरेसह परिसरातील दहा गावे कडकडीत बंद करण्यात आले आहे.

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण : बाबा भोले पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर

हाथरस प्रकरणात १०० हून अधिक लोकांचा बळी गेल्यापासून अज्ञातवासात असलेला भोले बाबा पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आले आहेत. 'आम्ही २ जुलैला घटनेनंतर खुप दुःखी असल्याचं भोले बाबा यांनी म्हटलं आहे. सर्वांनी शासनावर विश्वास ठेवावा. या प्रकरणात दोषी असतील, त्यांना सोडलं जाणार नाही. मृत कुटुंबाच्या लोकांना मदत केली जाईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT