Gadchiroli, Rain saam tv
महाराष्ट्र

Chandrapur : ब्रम्हपुरी-गडचिरोली मार्ग बंद; दळणवळण ठप्प (व्हिडिओ पाहा)

पूरामुळे काही भागात वाहतूक खंडीत झाली आहे. तरी काही भागातील वाहतुक बंद करण्यात आली आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात वैनगंगेच्या शेजारी असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी अजूनही कायम आहे. गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या महाविसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपळगाव, लाडज, खरकाडा, पारडगाव या सारख्या अनेक गावांना आणि या गावातील शेतीत पाण्याचा वेढा पडलाय. (Gadchiroli Rain Update)

रस्त्यावर, पुलांवर पाणी असल्याने ब्रम्हपुरी-गडचिरोली (gadchiroli) मार्गावरील वाहतूक बंद आहे. गेल्या 24 तासापासून जिल्ह्यात पाऊस नाही. मात्र गोसेखुर्दचा विसर्ग कमी झाल्यावरच पुराचे पाणी उतरणार आहे. किन्ही येथील विद्युत उपकेंद्र पाण्याखाली आले आहे.

पुराचे पाणी वाढल्यास या उपकेंद्राला जोडलेली गावे अंधारात जाण्याची शक्यता आहे. बेटाळा फाट्यावरील महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालय पाण्याखाली आले आहे. ब्रह्मपुरीत तालुक्यातील नदी काठालगत असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT