High Court cracks down on SRA housing scam – strict orders issued against illegal sales of beneficiary homes in Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

SRA Houses Mumbai: SRA ची घरं विकता येणार नाहीत; उच्च न्यायालयाचे महत्वाचे आदेश

HC Pulls Up SRA Officials: आता एसआरए ची घरं विकता येणार नाहीत.. यासंदर्भात हायकोर्टानं महत्वाचे आदेश दिलेत.. मात्र कोर्टाने नेमकं काय म्हटलंय आणि कोर्टाने एसआरए ला का झापलंय?

Bharat Mohalkar

मुंबई उच्च न्यायालयाने आता SRA ची घरं विकणाऱ्यांना चांगलंच झापलंय.. 5 वर्षाच्या आत SRA ची घरं विकता येणार नाहीत, असे आदेशच उच्च न्यायालयाने SRA ला दिलेत.. एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर SRA ची घरं विकली जात असल्याने हायकोर्टाने SRA च्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरलंय..

SRA मध्ये मिळालेली घरं 5 वर्षाच्या आत विकल्यास ताबा काढून घ्या

ताब्यात घेतलेली घरं प्रकल्पबाधितांना द्या

बेकायदा घरं ताब्यात घेऊन घुसखोरी करणाऱ्यांना तातडीने घराबाहेर काढा

कायदा मोडणाऱ्यांचा SRA च्या घरावर हक्क राहणार नाही

लाभार्थींची घरं ताब्यात घेतल्यानंतरच बेकायदा कृतींना आळा बसेल

खरं तर वांद्रे येथील निर्मलनगरमधील SRA प्रकल्पातील घरं पात्र झोपडपट्टीधारकांना मिळाली नाही, असा आरोप करत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.. विशेष म्हणजे 7 जानेवारी 2025 ला ओसी मिळाल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात 803 झोपडीधारकांच्या सोसायटीतील तब्बल 410 लाभार्थ्यानी घरं विकली आहेत...तब्बल 50 टक्के घरं विकली गेल्याने त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केलाय.. एवढंच नाही तर SRA च्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत... हा विषय फक्त वांद्र्यातील प्रकल्पापुरता मर्यादित नाही... तर मुंबई आणि मुंबई उपनगरात 2260 SRA प्रकल्प सुरु आहेत.. त्यामुळे एका प्रकल्पात 50 टक्के झोपडीधारकांनी घरं विकली असतील.

तर 2260 प्रकल्पातील आकडा हजारोंच्या घरात असण्याची शक्यता आहे..एसआरएच्या मूळ कायद्यानुसार 10 वर्षापर्यंत घरं विकता येत नव्हतं.. मात्र 2020 मध्ये जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना त्यांनी या कायद्यात बदल करुन हा नियम 5 वर्षांवर आणला.. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा नियम 3 वर्षापर्यंत आणण्यात आला..त्यामुळे आता उच्च न्यायालयाने याची दखल घेत खडसावलं असलं तरी SRA चे प्रकल्प प्राईम लोकेशनला आहेत..त्यामुळे घरं महागड्या किंमतीला विकून झोपडीधारक पुन्हा झोपडपट्टीत राहायला जात असतील तर अशा घरमालकांवर कठोर कारवाई करायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officer Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई; राज्यातील 34 झेडपी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश

नंदूरबारच्या कलेक्टरचा नवा पायंडा,खेड्यातल्या अंगणवाडी कलेक्टरची मुलं

नमाज पडतानाच पडला बॉम्ब, क्षणातच मशिद झाली कब्रस्तान

परप्रांतीयांना जमीन विकायची नाही,कोकणातल्या गावाचा आदर्श ठराव

Latur Crime: लातूर हत्याप्रकरण; राष्ट्रवादी पदाधिकारी अनमोल कवठे, सोनाली भोसलेच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT