court Saam Tv
महाराष्ट्र

Satara News : १४ काेटींचा अपहार; सातारासह पुण्यातील १3 जणांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयात नुकताच अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत १३ काेटी ६४ लाख ७१ हजार ८७६ रुपयांच्या चाेरीसह भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सातारा आणि पुण्यातील १३ जणांचा अटकपुर्व जामीन अर्ज नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. (bombay high court granted anticipatory pre arrest bail of 13 citizens from satara and pune latest marathi news)

युटाेपिया कंपनीचे प्रमुख प्रसन्न देशमुख यांनी सातारा (satara) सिटी पाेलिस ठाण्यात सुमारे दीड महिन्यांपुर्वी तक्रार दिली हाेती. यामध्ये कंपनीचे भागिदार महेश साखळकर यांनी अन्य संशियत आराेपींशी संगनमत करुन कंपनीचा अधिकृत लाेगाेचे डिझाईन चाेरुन घाेटाळा केल्याची तक्रार दाखल झाली हाेती. या प्रकरणातील संशयित आराेपींना अटकेपासून सुरक्षा मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात नुकताच अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता.

या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात भूषण महाडिक आणि चंद्रकांत बेबले या वकीलांनी संशयितांच्या वतीने युक्तीवाद केला. वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने १३ जणांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. याबराेबरच तन्मय रनसिंग, नीतेश गायकवाड, देवदत्त काणे, व दिनेश फलक यांना अटक (arrest) करण्यात आली हाेती. या सर्वांचा सातारा (satara) न्यायालयात नुकताच जामीन मंजूर झाला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

SCROLL FOR NEXT