saif ali khan saif ali khan
महाराष्ट्र

Saif ali khan attack update: 'शिकार' की आणखी काही...? सैफवरील हल्ल्याचे काळवीट प्रकरणाशी कनेक्शन?

Saif ali khan Attacked: सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात बिश्नोई गँगचा हात तर नाही ना? सलमान खाननंतर सैफ अली खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे का? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करीत आहेत.

Bhagyashree Kamble

अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या झाली होती. आज १६ जानेवारीला अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून धारदार शस्त्राने वार केले. त्याच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, सलमान खानच्या घरावरील हल्ला आणि बाबा सिद्दकीच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती आहे. अशातच सैफ अली खानवरही काळवीट कनेक्शनमुळे हल्ला करण्यात आलाय का? सलमान खाननंतर सैफ अली खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे का? असे प्रश्न नेटकरी उपस्थित करीत आहेत.

या तिन्ही घटना खरंतर वेगवेगळ्या आहेत. या घटनेनंतर बॉलिवूड तर हादरलं, शिवाय व्हिआयपींना इतकं सहजपणे लक्ष्य करणे खरंच सोपं आहे का? असा प्रश्न सोशल माध्यमांमध्ये उपस्थित होत आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाशी, बिश्नोई गँगशी काही संबंध आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

याघटनेबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासगळ्यात काळवीट शिकारीशी संबंध जोडला जात आहे. १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासह सैफ अली खान देखील होता. सध्या सैफ अली खानवरील हल्ल्याचाही संबंध लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी जोडला जात आहे. तर, काही नेटकरी असंही म्हणत आहेत की, लवकरच लॉरेन्स बिश्नोई सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतील.

सलमान खानच्या घरावर गोळीबार

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर, १४ एप्रिल २०२४ रोजी २ दुचाकीस्वार हल्लेखोरांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी ४ राऊंड फायर केले होते. गोळीबाराच्या वेळी सलमान खान घरीच होता. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती. यानंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली, बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आली.

बाबा सिद्दकी प्रकरण

राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात बिश्नोई गँगच्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

SCROLL FOR NEXT