blast in forest office parli near satara  saam tv
महाराष्ट्र

Satara Blast News : सातारा शहरानजीक शासकीय कार्यालयात स्फाेट, परिसर हादरला; अधिका-यांचे ताेंडावर बाेट

Satara News : पहाटेच्या सुमारास ऑफिस स्टोअर मध्ये जोरात आवाज झाला. यामुळे आम्ही कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली असे स्थानिकांनी साम टीव्हीला सांगितले.

ओंकार कदम

Satara :

सातारा शहरानजीक परळी येथे वन परिमंडल कार्यालयात आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फाेटामुळे वन परिमंडल कार्यालय परिसर हादरला. या घटनेत कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत परिमंडल कार्यालयातील कर्मचारी यांना चुप्पी साधली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेबाबत नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी परळी येथील वन परिमंडल कार्यालयामध्ये आज पहाटेच्या सुमारास ऑफिस स्टोअर मध्ये जोरात आवाज झाला. यामुळे आम्ही कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली.

त्यावेळी कार्यालयात कोणीही नव्हते. या घटनेची माहिती परळीचे वन परिमंडल अधिकारी यांना आम्ही दिली. दरम्यान या स्फोटाची भीषणता एवढी होती की स्टोअर रूम ऑफिस मधील खिडक्या दरवाजे उडून बाहेर पडले. या घटनेत कार्यालयाच्या छताचे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

घटनास्थळी जिलेटिन बॉम्ब सदृश्य वस्तू असाव्यात अशी शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे. या घटनेची चर्चा सातारा शहरात देखील चाैकाचाैकात सुरु आहे. या घटनेबाबत वन परिमंडल अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT