Blast in explosive Factory in Nagpur  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Latest News : नागपूरमध्ये दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, 6 महिलांसह 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Blast in explosive Factory in Nagpur : बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये दारुगोळा तयार करण्याचं काम केलं जात. हा दारुगोळा भारतीय सैन्याला पुरवला जातो.

प्रविण वाकचौरे

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur News :

नागपूरच्या बाजारगावमध्ये एक्सप्लोझिव्ह निर्मिती करणाऱ्या एका फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे. 9 कर्मचाऱ्यांच्या या स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे. तर काही जण आत अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, सोलार एक्सप्लोझिव्ह फॅक्टरीत हा भीषण स्फोट झाला आहे. स्फोट झालेल्या या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी कंपनीत काही कर्मचारी काम करत होते. त्यापैकी ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये दारुगोळा तयार करण्याचं काम केलं जात. हा दारुगोळा भारतीय सैन्याला पुरवला जातो. दारूगोळा बनवण्याचे काम सुरु असतानाच हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे.  (Latest Marathi News)

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील कंपनीबाहेर झाली आहे. राष्ट्रवादीचे नेत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT