fertilizer black marketing Saam tv
महाराष्ट्र

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

us israel iran war : आखाती देशात युद्ध सुरू असलं तरी देशात खतांची टंचाई नसल्याचा दावा सरकार करतंय.. मात्र कृषी सेवा केंद्रात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जातेय... त्याचाच भांडाफोड साम टीव्हीनं केलाय... पाहूयात याच खतांच्या काळा बाजाराचा पर्दाफाश या साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचं कृषी सेवा केंद्र आता लुटीचं केंद्र बनत चाललंय... त्याचं पितळ साम टीव्हीनं उघडं पाडलंय.. रब्बी हंगाम संपला... शेतकऱ्यांनी उन्हाळी मशागतीला सुरुवात करत खरीपाची हंगामाची तयारी सुरू केलीय... मात्र शेतकऱ्यांची अडवणूक करुन कृषी सेवा केंद्र चालकांनी खतांचा काळाबाजार सुरू केलाय...

बीडमध्ये खतांचा काळाबाजार सुरू असल्याची कुणकुण साम टीव्हीला लागली... आणि याच काळा बाजाराची पोलखोल करण्यासाठी साम टीव्ही पोहोचली थेट कृषी सेवा केंद्रात... तिथं 266 रुपयांचा युरिया तब्बल 360 ते 400 रुपयांना विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय...

शेतकऱ्यांची लूट फक्त बीडमध्येच नाही तर खान्देशात धुळ्यातही सुरु असल्याचं समोर आलंय.. खतांच्या दुकानात युरिया जवळपास दुप्पट दराने विकला जात असल्याचं चित्र आहे... त्यामुळे साम टीव्हीनं युरियाच्या काळा बाजार चव्हाट्यावर आणलाय..

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे खतांचा कच्चा माल आयातीवर परिणाम झालाय.... तर सरकार मात्र देशात कुठलीही टंचाई नसल्याचा दावा करतंय.. याच दरम्यान साम टीव्हीनं थेट स्टिंग ऑपरेशन करत डीएपी, युरिया या खतांचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब चव्हाट्यावर आणलीय...त्यामुळे सरकार आता तरी काळाबाजार रोखण्यासाठी पावलं उचलणार का? आणि शेतकऱ्यांच्या लुटीचं केंद्र बनलेल्या कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करणार का? याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, पक्षात काय घडतयं?

SCROLL FOR NEXT