पालघर जिल्यातील बोईसरमध्ये लसींचा काळाबाजार उघड रुपेश पाटील
महाराष्ट्र

पालघर जिल्यातील बोईसरमध्ये लसींचा काळाबाजार उघड

पालघर जिल्ह्यात लसीकरणाचा सुरू असलेला काळाबाजार शिवसेनेचे बोईसर विधानसभा संघटक नीलम संखे यांनी पुन्हा एकदा उघड केला आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर - जिल्ह्यात लसीकरणाचा सुरू असलेला काळाबाजार शिवसेनेचे बोईसर विधानसभा संघटक नीलम संखे यांनी पुन्हा एकदा उघड केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सियाराम या कंपनीत पैसे घेऊन लसीकरण होत होते. (Black market of covid vaccines exposed at Boisar in Palghar district)

हे देखील पहा -

याबद्दल माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखल होत हा प्रकार उघडकीस आणला आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याने लसीकरण करताना कंपनीतील कामगारांकडून प्रत्येकी डोस मागे अडीचशे रुपये घेतल्याचं कामगारांकडून सांगण्यात आलं आहे, तर शिवसेनेचे पदाधिकारी दाखल होताच काही कामगारांनी या कंपनीतून पळ काढला.

लसींचा काळाबाजार रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली

पालघर सारख्या ग्रामीण जिल्ह्यात आधीच लसीचा तुटवडा असताना वारंवार वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लसींचा केला जाणारा काळा बाजार वारंवार उघडकीस येतो. त्यामुळे यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नीलम संखे यांच्याकडून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT