नितीन राऊतांच्या ताफ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी फेकली वीजबिले! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

नितीन राऊतांच्या ताफ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी फेकली वीजबिले!

बदनापूर नगर पंचायतीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राऊत यांची बदनापूर शहरात जाहीर सभा आहे. या सभेच्या ठिकाणी नितीन राऊत जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

लक्ष्मण सोळुंके

जालना : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या ताफ्यावर वीज बिल फेकत भाजपा युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात सक्तीच्या वीज बिल विरोधात भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. बदनापूर शहरात भाजपा युवा मोर्चाच्या (BJYM) कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या गाड्यांचा ताफा अडवत महावितरण कडून पाठवण्यात आलेली वीज बिले अक्षरशः नितीन राऊत यांच्या गाडीवर फेकली.

हे देखील पहा :

यावेळी भाजपा (BJP) युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला. या वेळी कार्यकर्त्यांनी पहिले वीजबिल (Light Bill) माफ करा नंतर मतदानाची बात करा, अशी जोरदार घोषणाबाजी करत, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा जाहीर निषेध केला.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत आज नगर पंचायतीच्या प्रचारासाठी जालना (Jalna) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बदनापूर नगर पंचायतीच्या काँग्रेस (Congress) उमेदवारांच्या प्रचारासाठी राऊत यांची बदनापूर शहरात जाहीर सभा आहे. या सभेच्या ठिकाणी जात असताना, जालना-औरंगाबाद महामार्गावर बाळाजी चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर सक्तीच्या वीज बिल विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन केलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

SCROLL FOR NEXT