'फुकट वडापाव' प्रकरण : "रावसाहेब दानवे यांना लहानपणापासूनच फुकटात खायची सवय" SaamTvNews
महाराष्ट्र

'फुकट वडापाव' प्रकरण : "रावसाहेब दानवे यांना लहानपणापासूनच फुकटात खायची सवय"

ठाण्यात एका वडापाव सेंटरवर केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी वडापाववर फुकटात ताव मारला, यावर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी जोरदार टीका केली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : ठाण्यात एका वडापाव (Vadapav) सेंटर वर केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी वडापाववर फुकटात ताव मारला. त्यानंतर ठाण्याच्या गजानन वडापाव सेंटरच्या मालकांनी सोशल मीडियावर भाजपा कार्यकर्त्यांनी या वडापाव पार्टी नंतर पैसे न देतातच निघून गेल्याचा सर्व प्रकार व्हायरल केल्या नंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना लहानपणा पासूनच सर्व फुकटात खायची सवय असल्याची टीका राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केली आहे. (BJP workers Along With Union Minister Raosaheb Danve eats Vadapav For Free)

हे देखील पहा :

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तालुक्याचीच नव्हे जिल्ह्याचीही बदनामी केल्याचा आरोप करत चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. आमदार चंद्रकांत दानवे (Chandrakant Danve) यांनी म्हटले, मी माजी खासदार स्वर्गीय पुंडलिक हरी दानवे यांचा मुलगा असल्याने रावसाहेब दानवे यांना लहानपणापासून काय काय खाण्याच्या सावयी आहे हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ह्यांच्या विषयी भोकरदन, जाफ्राबाद,आणि जालना (Jalna) लोकसभा मतदार संघातील लोकांना चांगलेच माहीत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या या वागण्याने महाराष्ट्रात आमच्या दानवे परिवारासह गावची, तालुक्याची आणि जिल्ह्याची बदनामी ठाण्यातील एका वडापाववाल्या एका मालकांनी सोशल मिडियावर (Social Media) हा सर्व प्रकार व्हायरल केल्याने झाली आहे. या बदनामीला केंद्रीय रावसाहेब दानवे हेच जबाबदार असल्याने त्यांच्या या वागण्याचा जाहीर निषेध ही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइननेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT