bjp  saam tv
महाराष्ट्र

विधान परिषदेच्या ५ जागा भाजपच जिंकणार; 'या' नेत्याचा दावा

२० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

ओंकार कदम

सातारा : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीवरुन आता माणचे जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. 'रामराजे नाईक निंबाळकर यांना माणच्या मातीबद्दल आणि माणच्या नेत्यांबद्दल कायमच आकस राहीला आहे. जलसंपदा मंत्री होते, मात्र त्यांनी माण खटावला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादी पक्षाला माण तालुक्यात मान खाली घालावी लागत असेल तर ती रामराजे निंबाळकर यांच्यामुळेच अशी टीका जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केली.

माण मतदासंघ राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यातून गेला असेलतर फक्त रामराजें मुळेच. रामराजेंवर माझे जास्तच प्रेम असल्यामुळे त्यांना मी या निवडणुकीत अजिबातच मदत करणार नसून सर्व ५ उमेदवार भाजपचेच निवडून येतील असंही विधान जयकुमार गोरे यांनी केले.

प्रवीण दरेकरांची लोकल स्ट्रॅटर्जी

विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातील ही निवडणूक (Election) बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भाजपने आता अपक्ष आमदारांना भेटण्याचा सपाटा लावला आहे. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन रवाना लोकलने प्रवास करत रवाना झाले आहेत.

सर्वच पक्षांनी अपक्ष आमदारांच्या भेटगाठी सुरू केल्या आहेत. प्रवीण दरेकर आणि भाजप नेते गिरीष महाजन यांनी आज वाहतूक कोंडीची अडचण होऊ नये, म्हणून विरारसाठी लोकलने प्रवास केला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी एक एक मत मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) व आमदार गिरीश महाजन हे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला चर्चगेट स्टेशनहून लोकल ट्रेनने विरार करीता रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत सोबत आमदार मंगेश चव्हाणही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT