NCP leaders celebrate a historic clean sweep victory over BJP in Maval, Pune district. Saam Tv
महाराष्ट्र

25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग! भाजपचा सुपडासाफ, अजित दादांच्या पठ्ठ्याने करुन दाखवलं

BJP Lost All Seats In Maval Panchayat Samiti Election: मावळमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे.

Omkar Sonawane

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितिच्या निवडणुकीचे निकाल आज सुरू असून अनेक ठिकाणी भाजपने कमळ फुलवले आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारावेळी भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. मात्र, मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 अशा 15 ही जागा निवडून आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळमध्ये श्रेष्ठ आहे असे दाखवून दिले. भाजपने 15 पैकी 15 जागांवर लढून सर्वच ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. मावळमधून भाजपचा सुपाडासाफ झाला असे नागरिक म्हणू लागले आहे. एकेकाळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले होते की पुणे जिल्ह्यातूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार करू. मात्र आता भाजपच्याच या दारून पराभवामुळे भाजप संपला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे..

मावळमधील विजयी उमेदवारांची यादी

मावळ पंचायत समिती

टाकवे

१. प्राची देविदास गायकवाड

नाणे

२. अशा मोरमारे

वराळे

२. राजेश कडलक

इंदोरी

२. दिलीप ढोरे

खडकाळा

२. समीर जाधव

कार्ला

२. रेश्मा देवकर

कुसगाव

१. योगेश लोहर

काले

२. शैला कालेकर

सोमाटणे

२. साहेबराव कारके

चांदखेड

१. सुनीता येवले

जिल्हा परिषद

टाकवे नाणे

२. अनंता पावसे

इंदोरी वराळे

१. पल्लवी दाभाडे

खडकाळा- कार्ला

२. दीपाली हुलावळे

कुसगाव बुद्रुक - काले

२. संतोष राऊत

सोमाटणे चांदखेड

१. मनिषा मुऱ्हे

आमदार सुनील शेळकेंचा भाजपवर जोरदार हल्ला

जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 अशा एकूण 15 उमेदवार निवडून आणून मावळच्या जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवलेला आहे. नागरिकांनी दिलेला पाठिंबा आणि चांगले उमेदवार यामुळे आम्ही निवडून आलेलो आहे. भाजपला फक्त राजकारण करता येते, असं गणितच राजकारण करू नका बर्‍याचशा लोकांचे घर उध्वस्त करणारी भाजप आता यापुढे तरी अशा पद्धतीने वागू नका असा सल्ला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fennel Seeds Benefits: जेवणानंतर बडीशेप खाता? जाणून घ्या रोज बडीशेप खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे

Cabinet Meeting: अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण; राज्य सरकारनं घेतले १० महत्त्वाचे निर्णय

आजोबा-पणजोबांची जमीन नक्की कुठे अन् किती आहे? एका क्लिकवर शोधा ७/१२ अन् जमिनीचा नकाशा

Maharashtra News Live Update: चाकणमधील कंपनीला भीषण आग

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

SCROLL FOR NEXT