Chandrashekhar Bavankule SaamTvNews
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: पंतप्रधान कोण हवं? तरुणाच्या उत्तराने चंद्रशेखर बावनकुळेंची झाली फजिती

Chandrashekhar Bawankule: यात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे लोकांमध्ये जाऊन त्यांना प्रश्न विचारत आहेत

Vishal Gangurde

Chandrashekhar Bawankule News:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकाचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप थेट रस्त्यावर उतरली आहे. राज्यात लोकसभेच्या एकून 48 जागांपैकी भाजप 45 प्लस जागा निवडणून आणण्यासाठी चांगलीच रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने महाविजय 2023 संकल्प यात्रेला सुरूवात केली आहे. या यात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लोकांमध्ये जाऊन त्यांना प्रश्न विचारत आहेत. (Latest Marathi News)

भाजपने आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविजय 2023 संकल्प यात्रेला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची आज रायगडच्या आलिबागमध्ये यात्रा होती. या यात्रेत चंद्रशेखऱ बावनकुळे हे दारोदारी जाऊन लोकांना प्रश्न विचारत होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पंतप्रधान कोण हवं, या प्रश्नाला अनेक जण मोदींचे नाव घेत होते. तर अनेक लोक लाजून काहीच बोलतच नव्हते. असाच प्रश्न विचारत विचारत चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा या टोपीवाल्याच्या दुकानात पोहचला. बावनकुळे यांनी यालाही तोच प्रश्न विचारला. या तरुणाने थेट राहुल गांधींचं नाव घेतलं.

या तरुणाच्या आजूबाजूला इतके मोदी समर्थक आहेत. याचा विचार न करता तरुणाने थेट राहुल गांधींचं नाव घेतलं. ते पण कुणासमोर? तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसमोर...काय ते प्रेम म्हणावं ना...पण याने राहुल गांधींचं का घेतलं असावं? केंद्र सरकारची 9 वर्षांची कामगिरी पाहून घेतलं? की खरंच राहुल गांधी याचा जीव की प्राण आहेत. असा प्रश्न उपस्थित होत आहे. या तरुणाने कसलीच भीती न बाळगता स्वत:चं मत मांडलं.

चंद्रशेखर बावनकुळेंनी विषय सावरला, पुढे म्हणाले...

50 पैकी एकाने राहुल गांधींचं नाव घेतलं म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला धन्यवाद केलं. त्यानंतर त्यांनी पुढची वाट धरली. पण या सगळ्यात एक विशेष बाब दिसली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या तरुणाच्या मताचा आदर केल्याचे दिसून आले. चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT