chandrashekhar bawankule and nana patole  saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : 'नाना पटोले हे फडणवीसांच्या नखाची...'; चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका

नाना पटोलेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Chandrakant bawankule News : शिंदे सरकारने पालकमंत्र्याची घोषणा केली आहे. शिंदे सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. नाना पटोलेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पालकमंत्री पदावरून केलेल्या टीकेला उत्तर दिले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही.नाना पटोले यांनी त्यांच्या जिल्ह्यात,मतदारसंघात काय परिस्थिती आहे, हे बघितले पाहिजे. फडणवीस यांन वर्धा, गोंदिया, अमरावती, अकोला माहित आहे. नाना पटोले यांना अभ्यास करावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याची त्यांची उंची राहिली नाही. नाना पटोले हे जिल्ह्याचे नेते राहिले आहे. काही दिवसात विधानसभेचे नेते होतील अशी त्यांची स्थिती आहे'.

'महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्षे झाले धानाचा बोनस दिला नाही. शेतकऱ्यांची वीज कापली. शेतकऱ्यांना वीज दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाबाबतच्या व्हिजनबद्दल नाना पटोले हे एक टक्का देखील बरोबरी करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याची पूर्ण माहिती आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT