Osargaon Toll Naka, Sindhudurg, Nitesh Rane, Vaibhav Naik saam tv
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway News : टाेलचे पैसे घेणे झाले बंद; ओसरगाव टोल व्यवस्थापनावर राजकीय दबाव ? (पाहा व्हिडिओ)

Sindhudurg News : मुंबई- गाेवा महामार्गावर वाहनांच्या लागल्या हाेत्या रांगा.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Osargaon Toll Plaza News : मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) ओसरगाव टोल नाक्यावर (Osargaon Toll Naka) येथे आजपासून (बुधवार) टोल वसुली सुरू करण्यात आली होती. दाेन तासाच्या वसूलीनंतर काही तांत्रिक कारणामुळे टोल व्यवस्थापनामुळे टाेल वसुली बंद केली. दरम्यान राजकीय दबावामुळे व्यवस्थापनाने टाेल वसूली बंद केली अशी चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगली आहे. (Maharashtra News)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुली बाबत राजकीय नेत्यांचा विराेध हाेता. परंतु येथील स्थानिक राजकीय नेते तसेच जिल्हावासीयांचा विरोध डावलून आजपासून टोल वसूली सुरू करण्यात आली. सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना टोल माफी मिळावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हावासीयांनी केली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या मागण्यांकडे लक्ष न देता या टोल वसुलीला पोलीस बंदोबस्तासह सुरुवात करण्यात आली होती.

तांत्रिक कारणास्तव टाेल वसूली बंद

आज सकाळी आठ वाजल्यापासून वाहनधारकांकडून टाेल घेतला जात हाेता. दहा वाजता टाेल वसुली तांत्रिक कारणास्तव बंद केल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.

टाेल वसूलीस राणेंचा विराेध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुली हाेऊ देणार नाही अशी ठाम भूमिका आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांनी मांडली. ते म्हणाले 100 टक्के नुकसान भरपाई, जिल्हावासीयांना टोल माफी आणि आवश्यक सुविधा जो पर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत टोल वसुली करू देणार नाही. त्यासोबत केंद्र सरकार व संबंधित अधिकाऱ्यांशी आपण बोललो असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.

रत्नागिरीचा बंद अन्...

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी देखील टाेल वसूलीला विराेध दर्शविला आहे. ते म्हणाले शासनाच्या माध्यमातून ही अरेरावी सुरू आहे. रत्नागिरीचा टोल एकीकडे बंद असताना सिंधुदुर्गातील टोल पुन्हा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्याला आमचा प्रखर विरोध राहील असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

Hair Growth: हेल्दी, जाड अन् सिल्की केसांसाठी जास्वंदाचे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

SCROLL FOR NEXT