Raosaheb Danve vs Abdul Sattar Sillod Saam TV
महाराष्ट्र

Sillod Politics : अब्दुल सत्तारांमुळे सिल्लोडचा पाकिस्तान होतोय; शिवना येथील घटनेवर रावसाहेब दानवे संतापले

Raosaheb Danve vs Abdul Sattar : अब्दुल सत्तारांमुळे सिल्लोड तालुका पाकिस्तान होतोय, अशी टीका देखील माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

Satish Daud

Raosaheb Danve vs Abdul Sattar : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजप हायकमांड खडबडून जागे झाले आहे. आगामी विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. दानवे यांना भाजपच्या निवडणुकीत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलंय.

अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच रावसाहेब दानवे सतर्क झाले असून त्यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी दौरे सुरु केले आहेत. सोमवारी (ता. १६ सप्टेंबर) रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील शिवना येथे आले होते. यावेळी त्यांनी शिवना येथे समाजकंटकांनी घडवून आणलेल्या एका घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने पोलिसांनी विद्यार्थी तसेच तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप दानवे यांनी केला. इतकंच नाही तर रावसाहेब दानवे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवना रस्त्यावर आंदोलनही केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना दानवे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर शा‍ब्दिक हल्ला चढवला.

"सिल्लोडमध्ये जर कोणी प्लॉट घेतला तर त्यावर अतिक्रमण केले जाते. कोणता मोठा उद्योग येत असेल तर अर्धे पैसे म्हणजेच हिस्सेदारी मागितली जाते. अब्दुल सत्तारांमुळे सिल्लोड तालुका पाकिस्तान होतोय, अशी टीका देखील माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

दानवे यांच्या या आक्रमकपणामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही चांगलाच उत्साह भरला आहे. यावेळी भाजपचे नेते सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे, सुनील मिरकर, इद्रिस मुलतानी, अरुण काळे, अनिल खरात, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय दत्तात्रय वानखेडे यांच्यासह पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT