Raosaheb Danve On Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar News: तेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री होता आले नाही; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

Raosaheb Danve On Ajit Pawar: ... तर अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात. ते एक चांगले धडाडीचे कार्यकर्ते आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Raosaheb Danve On Ajit Pawar: राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं आकर्षण नाही, २०२४ कशाला, आमची आताही मुख्यमंत्रीपदावर दाव्याची तयारी आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकाळ माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. दरम्यान, यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले, त्यावेळी देखील राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या. मात्र अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही, ह्या राजकारणातल्या घटना असून राज्यालाही माहित आहे. भविष्यात कधी त्यांना १० ते २० वर्षात बहुमत मिळालं, तर अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात. ते एक चांगले धडाडीचे कार्यकर्ते आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया दानवे यांनी दिली. (Breaking Marathi News)

दरम्यान  अजित पवार यांनी (Ajit Pawar) शिंदे गटाच्या आमदारांना सूरत गाठण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदत' केल्याचं आरोप केला होता. त्यावरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. कुठलंही सरकार बनवण्यासाठी राजकारणात सरकारी यंत्रणा मदत करत नसते, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर कुठल्या नेत्यांना धोका असेल, तर त्यांचं रक्षण करण्याचं काम यंत्रणेचं असतं. असं म्हणत सरकार बनवण्यासाठी सरकारने कुठल्याही प्रकारे यंत्रणेचा वापर केला गेला नसल्याचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर त्यांना माझ्या शुभेच्छा - चंद्रशेखर बावनकुळे

अजित पवार हे जर मुख्यमंत्री झाले, तर त्यांना माझ्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुख्यमंत्री व्हायला कुणालाही आवडतं. मात्र, त्यासाठी संख्याबळ लागतं. २०२४ च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०० प्लस जागा जिंकेल. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा होणार हे तुम्हाला लक्षात आलंच, असेल असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT