Anil Bonde
Anil Bonde  SaamTv
महाराष्ट्र

अमरावतीची घटना म्हणजे महाविकास आघाडीचं पाप, खासदार अनिल बोंडेंचा घणाघात

साम टिव्ही ब्युरो

बुलढाणा : भाजपने निलंबित केलेल्या राष्ट्रीय प्रवक्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या (Umesh kolhe) करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना त्याब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीची घटना म्हणजे महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) पाप आहे. अमरावती येथे उमेश कोल्हे आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या दुकानातून बाहेर पडला असता, त्याचा गळा कापून खून केला जातो. ही घटना म्हणजे महाविकास आघाडीचे पाप आहे, असा घणाघात बोंडे यांनी मविआवर केला आहे.

खासदार बोंडे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, शिंदे-फडणवीस याच हिंदुत्ववादी सरकारची प्रतिक्षा संपूर्ण महाराष्ट्र करत होता. बुलढाणा लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार भाजपने केला आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघातून भाजपाचा खासदार निवडून आणू. मागील पंधरा वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत. म्हणून यावेळी भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असा विश्वास बोंडे यांनी व्यक्त केला आहे.

अमरावतीत नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाली होती, अशी पुष्टीही अमरावती पोलिसांनी दिली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदेश देऊन या प्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) सोपावला आहे. तसेच आतापर्यंत या प्रकरणात सर्व आरोपीेंना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता शहरातील १० लोकांना नुपूर शर्माबद्दल पोस्ट शेअर केल्याने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, असा गंभीर आरोप भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी चालल्याने काय फायदा होतो?

Onion Export: 'साम' च्या बातमीचा इम्पॅक्ट; आता गुजरातसोबत महाराष्ट्रातल्या कांद्याचीही निर्यात

Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple | उज्ज्वल निकम उमेदवारीनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT