bjp, maharashtra, pakistan foreign affairs minister bilawal bhutto zardari,  saam tv
महाराष्ट्र

BJP : देश का नेता कैसा हाे नरेंद्र माेदी जैसा हाे... पाकिस्तान मुर्दाबाद... राज्यभरात भाजपचे आंदाेलन

आज राज्यभरात भाजपने तीव्र आंदाेलन छेडलं आहे.

साम न्यूज नेटवर्क

BJP Maharashtra : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री राष्ट्राध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी (pakistan foreign affairs minister bilawal bhutto zardari) यांचा निषेध नाेंदविण्यात आले. झरदारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी-20 दरम्यान केलेले वक्तव्य हे अशोभनीय असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी नमूद केले. (Maharashtra News)

ठाण्यात आंदाेलन

ठाणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून झरदारी यांचा निषेध व्यक्त केला. पंतप्रधानांकडून संपूर्ण देश चालवला जातो. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पाकिस्तानचे राज्यमंत्री झरदारी यांनी चुकीचे वक्तव्य केल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

अमरावतीत आंदाेलन

अमरावती भाजपाकडून राजकमल चौकात पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री यांच्या विरोधात जोरदार घाेषणाबाजी करण्यात आली. यावेळी झरदारी यांच्या पोस्टरवर जोडे- चपला मारून त्यांचा निषेध व्यक्त केला. तर पोस्टर जाळून घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले. या वेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.

साेलापूरात आंदाेलन

भाजपकडून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भुट्टो यांच्या पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आमदार तथा माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्व भागातील दत्त चौक येथे आंदोलन झाले. यावेऴी पुतळा दहन प्रसंगी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

जालन्यात आंदाेलन

जालन्यात पाकिस्तान परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या पुतळ्याचं भाजपकडून दहन करण्यात आलंय. जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा होत असताना अशी टीका करणं हा संपूर्ण देशाचा अपमान असल्याचं सांगत जालन्यात स्वातंत्र्य वीर चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाकच्या विदेश मंत्र्यांच्या विरोध जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन (aandolan) करण्यात आले आहे.

यावेळी भाजपा (bjp) कार्यकर्त्यानी पाकिस्तान मुर्दाबाद,बिलावल भुट्टो मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देत बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळयाचे दहन केले. या आंदाेलनात भास्कर दानवे (उपजिल्हाध्यक्ष, भाजप) यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT