Vinod Gangne, accused in the Tuljapur drug trafficking case, receives BJP’s nomination for the municipal mayor post, sparking statewide political controversy. Saam Tv
महाराष्ट्र

ड्रग्जचा आरोपी नगराध्यक्षपदाचा उमेदवार, भाजपचा निर्णय, राजकारणात खळबळ

Drug Accused Vinod Gangne For Mayor Post: आमदार-खासदार झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही ऐकलं आणि पाहिलं असेल...मात्र ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला थेट नगराध्यक्षपदाचं तिकीट दिल्याचं तुम्ही पाहिलं नसेल...मात्र आता राज्यात तेही घडलंय...कोणत्या पक्षानं आणि कुठे हा कारनामा केलाय

Girish Nikam

.फोटोतील विनोद गंगणे हे नाव काही महिन्यांपूर्वी तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात गाजत होतं. महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या भवानी देवीच्या तुळजापुर नगरीला नशेचा विळखा बसला आहे. राज्यभरात गाजलेल्या या गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणेला अटक झाली होती. तो काही दिवस जेलमध्ये होता. सध्या जामिनावर बाहेर आला आहे. याच ड्रग्ज तस्कर विनोद गंगणेला भाजपने थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय. गंगणेच्या उमेदवारीवरुन विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. जनतेनं गुन्हेगाराला धडा शिकवावा अशी मागणी ठाकरेसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय.

ड्रग्स तस्करीतील आरोपींच्या जवळकीवरुन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील वादात सापडलेत. ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून चिंता वाटली असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी आरोपींच्या भाजप प्रवेशावरुन थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं होतं. या पत्राला राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रातूनच उत्तर दिलंय. तसंच राजकीय अपरिहार्यतेपोटी सुप्रिया सुळेंनी आरोप केले असतील असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला.

याआधी गँगस्टर दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता प्रकरणात भाजपनं नाशिकमधील ठाकरे सेनेचे नेते सुधाकर बडगुजरांविरोधात रानं उठवलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वर याने भाजपात पक्षप्रवेश केला. हे कमी होतं की काय पालघर साधू हत्याकांडातला आरोपी काशिनाथ चौधरींनाही भाजपनं प्रवेश दिला होता. मात्र चौफेर टीका झाल्यामुळे अखेर चौधरींच्या प्रवेशाला स्थगिती देण्याची नामुष्की भाजपावर आली.

नगराध्यक्षासारख्या जबाबदारीच्या पदासाठी इलेक्टोरल मेरीटच्या नावाखाली गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला निवडणुकीत उतरवले जात आहे. गंगणे दोषी नसले तरी ते ड्रग्ज तस्करीतले मुख्य आरोपींपैकी एक आहेत. त्यांना जोपर्यंत कोर्टाकडून दोषमुक्त केलं जात नाही तोपर्यंत निवडणुकीपासून दूर ठेवता आलं असतं. मात्र अशा प्रकारांमुळेच राजकारणाची प्रतिमा सुधारण्याऐवजी आणखी बिघडणार एवढं मात्र नक्की..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Pune Mhada: पुणे म्हाडाच्या ४१८६ घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; आता नवीन तारीख काय?

Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या; आज कुठे कसं हवामान?

Expressway Accident : हायवेवर पहाटे काळाचा घाला, ७ बसे अन् ३ कार जळून खाक, ७ जणांचा जळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT