Sakshi Maharaj On Raj Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

उत्तर भारतीयांबद्दल असं कसं बोलू शकता ?; साक्षी महाराजांचा थेट राज ठाकरेंना सवाल

मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीयांबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकतात, असा थेट सवाल भाजप खासदार साक्षी महाराज यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : अटकपासून कटकपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व देश एक आहे. सगळ्यांना सगळ्या ठिकणी जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या ( Uttar Pradesh ) बद्दल केलेले भाष्य चूकीचेच आहे. विभीषण देखील भगवंतांच्या शरण आला, त्याला देखील भगवंतांनी स्वीकार केले. मग मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीयांबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकतात, असा थेट सवाल भाजप खासदार साक्षी महाराज यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना केला आहे. ( BJP MP Sakshi Maharaj On MNS Chief Raj Thackeray )

हे देखील पाहा -

भाजप खासदार साक्षी महाराज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यादरम्यान त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. 'राज ठाकरेंना विरोध करणारे विरोध करताहेत,स्वागत करणारे स्वागत करत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या बद्दल केलेले वाक्य चूकीचेच आहे. अटक पासून कटक पर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व देश एक आहे. सगळ्यांना सगळ्या ठिकणी जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळं अयोध्यावासीयांची राज ठाकरेंनी माफी मागावी एवढीच माफक अपेक्षा आहे. त्यांनतर ठाकरेंनी दर्शनाला यावे'.

पुढे साक्षी महाराज म्हणाले, ' विभीषण देखील भगवंतांच्या शरण आला, त्याला देखील भगवंतांनी स्वीकार केले. मग मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीयांबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकतात, असा थेट सवाल खासदार साक्षी महाराजांनी राज ठाकरे यांना केला आहे. दरम्यान, साक्षी महाराजांनी मशिदीवरील भोंग्यावरही भाष्य केलं. 'उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांनी स्वतःहून मशिदीवरील लाऊड स्पीकर काढले. हा विषय हिंदू मुस्लिम नसून ध्वनी प्रदूषणाचा आहे, असं साक्षी महाराज म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT