BJP MP Prataprao Chikhalikar Vehicles vandalized by Maratha protesters in nanded Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: भाजप खासदाराला मराठा आंदोलकांनी घेरलं; ताफ्यातील दोन गाड्याही फोडल्या, नेमकं काय घडलं?

Nanded Breaking News: संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या देखील फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Satish Daud

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

BJP MP Prataprao Chikhlikar News

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना मराठा संघटनांकडून गावबंदी करण्यात येत आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. याचा फटका राजकीय नेत्यांना देखील बसताना दिसून येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेडचे (Nanded News) भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग याच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले होते.

खासदार चिखलीकर गावात आल्याचं लक्षात येताच गावकरी आक्रमक झाले. आरक्षण दिल्याशिवाय आमच्या गावात पाय ठेवू नका, असं म्हणत संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांना घेरलं. यावेळी एक मराठा, लाख मराठा. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केली.

दरम्यान, संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या देखील फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, मराठा समाजाच आक्रमक झाल्याचं लक्षात येताच चिखलीकर यांनी तातडीने अंबुलगा गावातून काढता पाय घेतला.

विशेष बाब म्हणजे, गुरुवारी अंबुलगा येथील मराठा संघटनांनी गावात एकमताने ठराव घेत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली होती. ही बाब चिखलीकर यांच्या लक्षात नव्हती. अशातच चिखलीकर आणि त्याचे कार्यकर्ते अंबुलगा गावात येताच मराठा तरुण एकत्र जमले. त्यांनी वाद घालत चिखलीकर यांना गावातून परत पाठवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon Tourist Hidden: चाळीसगावजवळ लपलेली Top 5 पर्यटनस्थळे, एका दिवसात फिरून या

Kudal Tourism : पावसाळ्यात कोकणात गेल्यावर 'कुडाळ' हे ठिकाण नक्की फिरा, पाहा ५ निसर्गरम्य पर्यटन स्थळे

एकनाथ शिंदेंच्या आमदाराची 40 लाखांची डिल, कथित व्हिडिओ व्हायरल; राजकारणात मोठा भूकंप

Maharashtra News Live Update: टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षक क्रांती संघटना आक्रमक; परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी

Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

SCROLL FOR NEXT