Nitesh Rane On CM Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचं आणि झोपवायचं...; नितेश राणेंचा प्रहार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांच्या अडचणीत भर पडली आहे. जुहू येथील अधीश बंगल्याचा अनधिकृत बांधकामप्रकरणी राणे यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस धाडली आहे. मुंबई महापालिकेनंतर (BMC )आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने राणेंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कुठलाही नियम नसताना कारवाई करतात.आताच घरी एक नोटीस दिली आहे. काही लोक क्षणात निर्णय घेतात. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचं आणि झोपवायचं, हे आम्हाला माहित आहे, असा घणाघात राणेंनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना राणे म्हणाले, महाराष्ट्राला पणवती लागून आज अडीच वर्षे झाली आहेत. चपट्या मुख्यमंत्री राज्याला भेटलेला आहे.उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कुठलाही नियम नसताना कारवाई करतात.आताच घरी एक नोटीस दिली आहे.काही लोक क्षणात निर्णय घेतात.वडिलांच्या आशीर्वादाने पद मिळवतात आणि मान सन्मान ठेवत नाहीत.

उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला होता.देवेंद्र फडणवीस यांना फसवले. महाराष्ट्रला अडीच वर्षे पणवती लागली.अडीच वर्षे झाले महाराष्ट्रावर राज्य करतात.चपट्या माणसाचे अडीच वर्षे झाले. कुठलाही विकासकाम या महाराष्ट्रात होत नाही.फक्त लोकांना लुटायचा हे एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्र मध्ये सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचे आणि झोपवायचे, हे आम्हाला माहीत आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT