Jaykumar Gore Saamtv
महाराष्ट्र

Jaykumar Gore Accident: भीषण अपघात, आयसीयूमध्ये उपचार अन् तरीही... आमदार गोरेंच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचार घेत असताना आमदार जयकुमार गोरे यांच्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MLA Jaykumar Gore: माण- खटाव तालुक्याचे भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचा काल भीषण अपघात झाला. या अपघाताच्या बातमीची राज्यभरात जोरदार चर्चा झाली. या अपघातानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यांसह अनेकांनी कॉल करुन त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली होती.

गंभीर अपघात होऊन पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचार घेत असताना आमदार जयकुमार गोरे यांच्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हायरल फोटोमध्ये आमदार गोरे उपचार घेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम ऐकत आहेत. या फोटोची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सातारा जिल्ह्याचे भाजपा (BJP) अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाला. नागपुर अधिवेशन संपवून दहिवडीकडे जात असताना फलटण जवळील मलटणच्या पुलावर पहाटे तीन वाजता हा अपघात घडला. ज्यामध्ये गंभीर दुखापत झालेले आमदार गोरे सध्या पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मात्र सध्या सोशल मीडियावर आमदार गोरेंच्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हायरल फोटोमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेले गोरे आजची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची 'मन की बात' ऐकत असल्याचे दिसत आहे. त्यांच्याशेजारी खासदार रणजितसिंह निंबाळकरही बसल्याचे दिसत आहे.

आमदार गोरेंच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेल्या या फोटोला भाजपामध्ये राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि स्वहित सर्वात शेवटी याचे जिवंत उदाहरण म्हणजे भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे असा कॅप्शन दिला आहे. फोटोमध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकरांसह खासदार उदयनराजेही दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT