Sad Demise of BJP Leader Harish Pimpale’s Father Saam
महाराष्ट्र

पिंपळे परिवारावर दुखा:चा डोंगर; भाजप आमदाराच्या वडिलांचं निधन; मंत्र्यांकडून शोक व्यक्त

Sad Demise of BJP Leader Harish Pimpale’s Father: भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या वडिलांचं निधन. मारूती अप्पा पिंपळे यांनी घेतला अखेरचा श्वास. मंत्र्यांकडून शोक व्यक्त.

Bhagyashree Kamble

  • दुख:द बातमी!

  • भाजप आमदाराच्या वडिलांचं निधन

  • पक्षातील नेत्यांकडून शोक व्यक्त

अक्षय गवळी, साम टिव्ही

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर मतदारसंघातून एक दुख:द बातमी समोर येत आहे. भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. मारुती अप्पा पिंपळे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पिंपळे यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात तसेच गावात शोककळा पसरली आहे.

हरीश पिंपळे यांच्या वडिलांच्या दुख:द निधनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केल्या आहेत. तसेच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासह प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नामदार एडवोकेट आकाश फुंडकर, महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शोक संवेदना व्यक्त केल्या आहे.

मारूती अप्पा हे धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने पडद्यामागे काम करणारे होते. मारुती अप्पा पिंपळे यांच्या निधनाने पक्षाची फार मोठी हानी झाली, पिंपळे परिवारावर आलेले दुःख सहन करण्याची ताकद देऊन त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो, अशा शब्दांत भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी शोक व्यक्त केल्या.

हरीश पिंपळे यांनी आपल्या वडिलांची सेवा करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भक्ती आणि श्रद्धासोबत मानवता धर्माचं पालन केलं, अशा शिकवण देणाऱ्या मारुती अप्पा पिंपळे यांच्या निधनाने भारतीय जनता पक्ष परिवाराची फार मोठी हानी झाली, अशा शब्दांत अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी शोक व्यक्त केल्या.

तर सामाजिक वारस म्हणून आमदार हरीश पिंपळे यांना शिकवण देऊन संसार नीट चालून सामाजिक चळवळमध्ये सक्रिय भाग घेणारे मारुती अप्पा पिंपळे यांच्या निधनाबद्दल अकोट मतदारसंघांचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दुःख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली दिलीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संजय राऊत यांना आज मिळणार डिस्चार्ज

Actor Abhinay News: प्रसिद्ध अभिनेत्याचं ४४ व्या वर्षी निधन, लिव्हर झालेले निकामी, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

MHADA Homes: पुण्यातील हिंजवडी, वाकडमध्ये फक्त २८ लाखात घर; खरं की खोटं? म्हाडाने दिली माहिती

रोड, बुलेट ट्रेन अन् विमानतळालाही जोडणार, Underground road networkला हिरवा कंदील, वाहतूक कोंडीतून सुटका

Reduce Cholesterol Naturally: घाणेरड्या कोलेस्ट्रॉलवर किचनमध्येच रामबाण उपाय, 'या' पदार्थामुळे धमण्या-नसांमधून धावेल १०० च्या स्पीडने रक्त

SCROLL FOR NEXT