Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धवा विसर तुझे सरकार...; भाजपच्या बड्या नेत्याचं ट्विट

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमुळं एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळपास ५० समर्थक आमदारांसह बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि ठाकरे सरकारमध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरु आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून भाजपच्या गोटात शांतता आहे. वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने आता शिवसेना आणि मविआच्या संघर्षात (Shivsena) उडी घेतली आहे. भाजपचा या बंडात हात नसल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमुळं एकच खळबळ उडाली आहे. उद्धवा विसर तुझे सरकार...असं ट्विट करुन भातखळकर यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. त्यांच्या या ट्विटमुळं राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळपास ५० समर्थक आमदारांसह बंडखोरी करुन महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पालटलं आहे. एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे सरकारमध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरु आहे. भारतीय जनता पक्षानेच बंडखोर आमदारांना गुवाहाटीत ठेवून महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली आहे, असा आरोपही शिवसेनेसह मविआ सरकार करत आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT