BJP Leader Saam
महाराष्ट्र

BJP leader crime: भाजप नेत्याच्या घरातच रक्तरंजित राडा; अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नी अन् मुलांवर झाडल्या गोळ्या

BJP leader kills wife and children: भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तिन्ही मुलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. पत्नीवर अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरोपीने पत्नी आणि मुलांना ठार केलं.

Bhagyashree Kamble

भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तिन्ही मुलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली आहे. या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, पत्नीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर आरोपी पलायन करण्याच्या तयारीत होता. मात्र, गावकऱ्यांनी त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. पत्नीवर असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने पत्नी आणि मुलांवर गोळ्या झाडल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

योगेश रोहिला असे आरोपीचे नाव आहे. तो भाजप पक्षातील कार्यकारिणी सदस्य आहे. योगेशला त्याची पत्नी नेहाबद्दल संशय होता. पत्नीचे अनैतिक संबंध सुरू आहेत, असे त्याला वारंवार वाटत होते. या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होत. शनिवारी योगेशला राग अनावर झाला. त्याने बंदूकीचा वापर करून पत्नी आणि मुलांवर गोळ्या झाडल्या.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्नी आणि मुलांना खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिन्ही मुलांचा मृत्यू तर, पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात श्रद्धा, मुलगा शिवांश आणि देवांश यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, गावकऱ्यांनी त्याला पकडले. तसेच मारहाणही केली.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पत्नीचाही जबाब घेण्यात येणार आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT